
मुंबई : प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचं असतं, त्यासाठी लोक हवी तेवढी मेहनत घेत असतात, कष्ट करत असतात. प्रत्येकजण सुखी राहण्यासाठी भरपूर कष्ट, मेहनत घेतात. पण काही लोकांना त्यांचे नशीब साथ देत नाही. ते कितीही काम करत असले तरी त्यांना हवं तसं यश मिळत नाही. कारण काही लोकांना वास्तू दोष पुढे जाऊ देत नाही. तर आपण आपल्या घरातील बेडवर झोपते त्याच्याशी संबंधित काही अशा वास्तू दोषाबाबत जाणून घेणार आहोत जे लोकांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊन देत नाहीत.
दागिने – कधीही तुम्ही तुमच्या घरातील पलंगाखाली दागिने ठेवू नका. कारण वास्तू नुसार पलंगाखाली दागिने ठेवणे अशुभ मानले जाते. तसेच पलंगाखाली दागिने ठेवल्यामुळे चोरीचीही भीती लोकांच्या मनात असते, त्यामुळे कधीही पलंगाखाली दागिने ठेवू नका.
झाडू – वास्तु तज्ञांच्या सल्ल्यानुसार, तुमच्या पलंगाखाली कधीही झाडू ठेवू नका. कारण पलंगाखाली झाडू ठेवल्यामुळे ते घरात अशुभ मानले जाते. यामुळे घरातील सदस्य आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीही पलंगाखाली झाडू ठेवू नका.
चप्पल – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील पलंगाखाली शूज किंवा चप्पल ठेवू नका, कारण ते अशुभ मानले जाते. पलंगाखाली चप्पल ठेवल्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे कधीही पलंगाखाली चप्पल न ठेवता ती तुमच्या खोलीच्या बाहेर किंवा दरवाजाच्या बाजूला ठेवा.
आरसा, तेल – कधीही तुमच्या पलंगाखाली आरसा किंवा तेल ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार, या गोष्टी पलंगाखाली ठेवल्यामुळे तुमच्या आर्थिक जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे कधीही पलंगाखाली आरसा, तेल ठेवू नका.