पाच दिवसानंतर चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे तीन राशींचं होणार भलं! लक्ष्मी योगामुळे आर्थिक कोंडी फुटणार

ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा आवाका पाहता कधी शुभ तर कधी अशुभ परिणामांचा सामना करावा लागतो. कधी कधी ग्रहांची उत्तम साथ लाभते. तर कधी ग्रहमान उत्तम असूनही दुसऱ्या ग्रहांचा अशुभ परिणाम पडतो. असा ग्रहांच्या बाबतीत बराच गुंता ज्योतिषशास्त्रात आहे. गोचर कुंडलीचा विचार करता त्याचा ढोबळमानाने राशीचक्रावर परिणाम होतो. प्रत्येकाला तसाच परिणाम भोगावाच लागेल असं नाही. मंगळ आणि चंद्राची युतीचा सकारात्मक परिणाम तीन राशींवर होणार आहे.

पाच दिवसानंतर चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे तीन राशींचं होणार भलं! लक्ष्मी योगामुळे आर्थिक कोंडी फुटणार
चंद्र आणि मंगळाची शुभ युती तीन राशींच्या पथ्यावर पडणार, अडचणींचा डोंगर दूर होण्यास होईल मदत
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 3:38 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची एक वेगळी ओळख आणि स्वभाव आहे. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या ग्रहासोबत एकत्र आला. यावरून परिणामांचा अंदाज बांधला जातो. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. पण गोचर करत असताना चंद्राची कला बदलत असते हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. चंद्र दर अडीच दिवसांनी राशीबदल करतो. एका राशीत अडीच ठाण मांडल्यानंतर लगेचच दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. चंद्राची मंगळासोबत युती झाली की, ज्योतिषशास्त्रात त्याला लक्ष्मीयोग गणलं जातं. त्याचा जातकांना विशेष लाभ होतो. चंद्र आणि मंगळाची युती 11 डिसेंबरला होणार आहे. चंद्र तूळ राशीतून 11 डिसेंबरला सकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या राशीत मंगळ स्थित असून ही मंगळाची स्वरास आहे. त्यामुळे या राशीतील लक्ष्मीयोग प्रभावी असेल. चला जाणून घेऊयात लक्ष्मीयोगाचा कोणत्या राशींना लाभ होणार ते…

या तीन राशींना मिळणार लाभ

वृश्चिक : या राशीच्या लग्न स्थानात म्हणजेच प्रथम स्थानात मंगळ आणि चंद्राची युती होत आहे. त्यामुळे आत्मविश्वासात दुप्पट वाढ होईल. तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव समोरच्या व्यक्तींवर पडेल. चंद्रामुळे स्वभाव शांत होईल. तसेच काम करत असलेल्या क्षेत्रात यशाची शिखरं गाठाल. आई वडिलांकडून उत्तम साथ मिळेल. कामानिमित्त प्रवास करण्याची वेळ येईल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

तूळ : या राशीच्या द्वितीय स्थानात मंगळ आणि चंद्राची युती होत आहे. द्वितीय स्थान हे धनस्थान मानलं जातं. त्यामुळे या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला धनलाभ होऊ शकतो. समाजात मानसन्मान वाढेल. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील. आत्मविश्वाससह मोठी जोखिम पत्कारण्याचा विचार करू शकता.पण तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घ्या. या राशीच्या जातकांना कामाच्या प्रभाव दिसून येईल.

मकर : या राशीच्या एकादश भावात मंगळ आणि चंद्राची युती होत आहे. या स्थानाला उत्पन्न स्थान म्हंटलं जातं. त्यामुळे उत्पन्नात चांगली वाढ होईल. काही करार निश्चित होतील. तसेच व्यवसायात प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल. पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. वाहन किंवा संपत्ती खरेदीसाठी हा काळ उत्तम राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.