AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhadra Rajyoga : बुधाच्या राशी परिवर्तनाने तयार होणार भद्र राजयोग, या तीन राशींच्या लोकांचे नशीब उजळणार

आता ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह 24 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या संक्रमणाने ‘भद्रा महापुरुष राजयोग’ (Bhadra Mahapurush Rajyoga) निर्माण होणार आहे.

Bhadra Rajyoga : बुधाच्या राशी परिवर्तनाने तयार होणार भद्र राजयोग, या तीन राशींच्या लोकांचे नशीब उजळणार
बुध राशी परिवर्तनImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 06, 2023 | 11:19 PM
Share

मुंबई : वैदिक जोतिषशास्त्रानुसार सर्व नऊ ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलत राहतात. या दरम्यान, ते अनेक शुभ आणि अशुभ योग देखील तयार करतात, ज्याचा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर होतो. आता ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह 24 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या संक्रमणाने ‘भद्रा महापुरुष राजयोग’ (Bhadra Mahapurush Rajyoga) निर्माण होणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर होईल. तथापि, अशा 3 राशी आहेत, ज्यांचा सर्वाधिक फायदा होईल आणि त्यांना प्रगती आणि संपत्ती मिळेल. चला जाणून घेऊया कोणत्या असतील ती 3 राशी.

या राशींच्या लोकांना होणार मोठा फायदा

धनु

‘भद्र महापुरुष राजयोग’मुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. अविवाहीत लोकांसाठी विवाहासाठी स्थळ येऊ शकतात. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

कन्या

मिथुन राशीतील बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या लोकांना सरकारी नोकऱ्या मिळू शकतात. स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. समाजात तुमचा सन्मान वाढेल. नोकरदारांना वेतनवाढीसह पदोन्नती मिळू शकते.

मिथुन

भद्र महापुरुष राजयोगामुळे  तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. राजकारणात सक्रिय लोकांना या महिन्यात मोठे पद मिळू शकते. तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतो. अनेक दिवसांपासून थांबलेला पैसा मिळू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.