Daily Horoscope: नशीब पलटणार, धनप्राप्ती होणार… वाचा आजचे 29 नोव्हेंबरचे राशीभविष्य
Daily Horoscope: आज 29 नोव्हेंबर 2026 रोजी रविवार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार हे वाचा...

प्रत्येक दिवस हा निरोगी आणि आनंदी जावा असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र, तो तसाच जाईल याची खात्री मात्र कोणी देऊ शकत नाही. अनेकांचा ज्योतिषशास्त्रावर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घेण्यासाठी अनेकजण राशीभविष्य वाचतात. आज अनेक राशींचा वाईट काळ संपून नव्या संधी मिळणार आहेत. तुमची रास कोणती आहे? तुमचे भविष्य काय सांगते वाचा…
मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. कामातून थोडा वेळ काढून स्वतःसाठी ब्रेक घ्या. अचानक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा. प्रवासाचा योग आहे. एकंदरीत दिवस समाधानकारक राहील.
वृषभ
आजचा रविवार तुमच्यासाठी उत्तम आहे. अनेक चांगल्या गोष्टी घडतील. नोकरी किंवा व्यवसायात सुरू असलेल्या योजना पूर्ण होतील. अचानक आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या आणि कामासोबत स्वतःलाही वेळ द्या.
मिथुन
आजचा दिवस ठीक ठरेल. छोट्या-मोठ्या अडचणी येऊ शकतात. कोणावर जास्त अवलंबून राहू नका, नाहीतर नुकसान होण्याची शक्यता आहे. फोकस ठेवून काम करा. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
कर्क
आजचा दिवस चांगला जाईल. अनेक अनुकूल योग जुळत आहेत. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मिळकतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात, त्यामुळे मन प्रसन्न राहील. दिवस समाधानकारक जाईल.
सिंह
आज आत्मविश्वासाने भरलेला दिवस असेल. कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही वादापासून दूर राहा, नाहीतर अनावश्यक तणाव वाढू शकतो. संयम ठेवल्यास दिवस अधिक चांगला जाईल.
कन्या
आज आर्थिक बजेट थोडे कोसळू शकते. अनेक ठिकाणी पैसे खर्च होतील, त्यामुळे शक्य तेवढे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि व्यवसायात चांगला नफा होण्याचे संकेत आहेत. कामासाठी प्रवासाचा योग आहे.
तुळ
आजचा दिवस ठीक राहील. नोकरी किंवा व्यवसायात कामाचा ताण जाणवू शकतो. नियोजनाने आणि फोकसने काम करा. छोट्या अडचणी येऊ शकतात. धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक
आजचा दिवस कधी आनंदी तर कधी थोडा तणावपूर्ण राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील, त्याचा फायदा घ्या. पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबात गैरसमज होऊ शकतात, म्हणून शांततेने हाताळा.
धनु
आजचा दिवस उत्तम आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन योजना आखण्यासाठी हा दिवस योग्य आहे. खर्च थोडा जास्त होऊ शकतो, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. मित्र आणि कुटुंबीयांचा आधार मिळेल.
मकर
आजचा दिवस कधी खुशी तर कधी थोडा चिंताग्रस्त राहील. कामात चांगली प्रगती होईल, पण जास्त ताण घेऊ नका. योग्य नियोजन केल्यास दिवस आरामदायक आणि फायद्याचा जाईल. पैशांबाबत सावध राहा आणि अनावश्यक खर्च टाळा. घरातील वातावरण ठीक राहील.
कुंभ
आज तुमच्या कल्पकतेला चालना मिळेल. नवीन प्रोजेक्ट्समध्ये यश मिळेल. मित्र आणि नातेवाईक मदतीसाठी उभे राहतील, त्यामुळे अडचणी लवकर सुटतील. पैशांबाबत सावधगिरी बाळगा. मुलाकडून आनंदाची बातमी येईल.
मीन
आजचा दिवस उत्तम आहे आणि मन प्रसन्न राहील. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. एखादी शुभ बातमी येऊ शकते. घरातील लोकांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आरोग्य चांगले राहील, पण जास्त विचार करून स्वतःला त्रास देऊ नका.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)