
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 23 June 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुमचे आरोग्य उत्तम राहील. आज तुम्ही एखाद्या लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. वाहन जपून चालवा. मित्रांकडून आर्थिक मदत मिळेल. व्यवसायात फायदा होईल. कुटुंबासोबतचे संबंध सुधारतील.
वृषभ राशीसाठी आजचा दिवस धावपळीचा असेल. तुमचे मन अशांत राहू शकते. तब्येत बिघडू शकते. व्यवसायात संयमाने निर्णय घ्या. कारण एखादी मोठी डील हातातून निसटण्याची शक्यता आहे. कुटुंबात पत्नीसोबत मतभेद होऊ शकतात.
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमचे एखादे अडलेले जुने काम पूर्ण होईल. ज्यामुळे मनात प्रसन्नता राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्यात चढ-उतार राहतील. व्यवसायातही लाभाचे योग आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला जाऊ शकता.
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी तुमचा दिवस उत्तम राहील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमचे आरोग्य ठीक असेल. व्यवसायात तुम्ही एखादे मोठे काम भागीदारीत सुरु करू शकता. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कुटुंबात नवीन पाहुणा येऊ शकतो.
आजचा दिवस सिंह राशीसाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. जे चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. त्यांना यश मिळेल. तुमचे आरोग्य ठीक राहील. कुटुंबात शुभ कार्याचे योग बनतील. परस्पर मतभेद दूर होतील. व्यवसायात एखादा मोठा करार किंवा निकाल तुमच्या बाजूने होऊ शकतो.
कन्या राशीसाठी आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्हाला कोर्ट केसमध्ये पराभव पत्करावा लागू शकतो, त्यामुळे आज विरोधकांपासून सावध रहा. व्यवसायात मोठा धोका पत्करू नका, कारण नुकसानीची शक्यता आहे. कुटुंबात वाद-विवादाची परिस्थिती निर्माण झाल्यास शांत रहा.
तुळ राशीच्या व्यक्तींना आज एखाद्या खास कामासाठी बाहेर जावे लागू शकते. त्यात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाल गमावल्याची बातमी मिळू शकते. तुम्ही स्वतः वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कुटुंबात आपल्या लोकांचे सहकार्य मिळेल. पत्नीसोबतचे संबंध चांगले राहतील.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. तुमची अधुरी कामे पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. ऑफिसमध्ये एखादे नवीन दायित्व मिळेल. तुम्हाला बॉसकडून प्रशंसा मिळेल. व्यापार-व्यवसायात लाभाची स्थिती निर्माण होईल.
धनू राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असाल, तर आज करू शकता, तुम्हाला यश मिळेल. भविष्यात मोठा नफा होईल. आज एखाद्या जुन्या व्यक्तीची भेट होईल. ज्यामुळे मन प्रसन्न राहील. तुम्हाला अडकलेले धन प्राप्त होईल. तुमचे आरोग्य ठीक राहील.
मकर राशीच्या लोकांचा दिवस धावपळीत जाईल. तुम्ही एखाद्या वाद-विवादात अडकू शकता, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विरोधकांच्या षड्यंत्राचे बळी होण्यापासून वाचा. तुम्हाला आरोग्यात घट जाणवेल. व्यवसायात नुकसानीची शक्यता आहे. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद होऊ शकतो.
कुंभ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. तुम्हाला कोर्ट केसमध्ये पराभवाला सामोरे जावे लागू शकते. व्यापारात मोठे नुकसान होऊ शकते. विरोधी वर्ग षड्यंत्र रचू शकतात. कुटुंबात पत्नीसोबत मतभेद वाढू शकतात. त्यामुळे वाणीवर संयम ठेवा.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येतून मुक्त होऊ शकता. तुम्हाला कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात विजय मिळेल. व्यापार-व्यवसायात लाभ होईल. तुम्हाला नातेवाईक आणि मित्रांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. तुमचे अडकलेले धन देखील मिळू शकते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)