
Surya Nakshatra Parivartan 2026: साल २०२५ संपायला काही तास उरले आहेत, आणि नवे वर्षे २०२६ सुरु होत आहे. नव्या २०२६ सालाच्या आगमनावर एक दुर्लभ संयोग घडत आहे. साल २०२६ हे सुर्याचे वर्षे आहे आणि वर्षाच्या पहिल्याच दिनी १ जानेवारी रोजी सुर्य पद नक्षत्र परिवर्तन करणार आहे. या दिवशी सुर्य पूर्वाषाढ नक्षत्राच्या द्वितीय पदात प्रवेश करत आहे. यापूर्वी सुर्याने याच नक्षत्रात शुक्राशी संयोग केला आहे. साल २०२६ च्या शुभारंभावर सुर्य पद नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी फळणारे आहे. या लकी राशींची माहिती घेऊयात.
पूर्वाषाढ़ा नक्षत्राच्या द्वितीय पदात सुर्याचा प्रवेश वृषभ राशींना भाग्यशाली बनवू शकतो. वृषभ राशीत प्रगतीसाठी नवीन संधी मिळू शकतात. करियर, नोकरी, व्यापारात लाभाची शक्यता आहे. कुठे पैसे अडकले असतील तर हे धन परत मिळू शकते. व्यापारास पुढे नेण्यास हा काळ अनुकुल आहे. कार्यालयात सहकाऱ्याचे समर्थन मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुलतील. गुप्त स्रोतातून देखील तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. वडीलांच्या सहकार्याने महत्वाची कामे पूर्ण होतील.
सुर्याचे पद नक्षत्र परिवर्तन तुम्हाला सकारात्मक परिणाम देणारे साबित होऊ शकते. नोकरी पेशा लोकांना नव्या जॉबची ऑफर मिळू शकते. प्रमोशन- इन्क्रीमेंटची शक्यता आहे. नवीन लोकांशी ओळख होईल. वडीलांशी चांगले संबंध होतील. नशीबाची संपूर्ण साथ तुम्हाला मिळेल. करियर संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्याची शक्ती तुम्हाला मिळेल. आरोग्याची स्थिती आधीपेक्षा चांगली होईल. जुन्या रोगांपासून सुटका मिळू शकते. आजारावर खर्च होणारा पैसा कमी होऊन दिलासा मिळेल.
सिंह राशीच्या लोकांनाही पद नक्षत्र परिवर्तन शुभ फळ देणारे आहे. तुमची आत्मविश्वासात वाढ होईल आणि करियरमध्ये उंच उड्डाण होईल. व्यापारात फायदा होऊन संधी मिळेल. अचानक धनाचा लाभाचा योग देखील आहे. भविष्याशी संबंधित निर्णय घेण्यासाठी स्वत:ला मानसिक रुपाने तयार राहतील. आपल्या व्यक्तीमत्वात त्यामुळे मोठा बदल होईल आणि रचनात्मक कामात रुची वाढेल. क्रिएटीव्ह फिल्ड कार्यरत लोकांसाठी हा वेळ खूप चांगला आहे.