AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Leo/Virgo Rashifal Today 16 June 2021 | मित्राशी वाद होऊ शकतो, मोठा खर्च होईल

धवार 16 जून 2021 आहे (Leo/Virgo Rashifal). बुधवारचा दिवस हा विघ्नहर्ता भगवान गणेशाला समर्पित असतो. यादिवशी उपवास केल्याने तसेच गणेशाची विधीवत पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. सिंह आणि कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत

Leo/Virgo Rashifal Today 16 June 2021 | मित्राशी वाद होऊ शकतो, मोठा खर्च होईल
Leo Virgo
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jun 16, 2021 | 2:04 PM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : बुधवार 16 जून 2021 आहे (Leo/Virgo Rashifal). बुधवारचा दिवस हा विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाला समर्पित असतो. यादिवशी उपवास केल्याने तसेच गणेशाची विधीवत पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. सिंह आणि कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या बुधवारचं संपूर्ण राशीभविष्य (Leo/Virgo Daily Horoscope Of 16 June 2021 Sinha And Kanya Rashifal Today) –

सिंह राश‍ी (Leo), 16 जून

ग्रहांची स्थिती आपल्या बाजूने आहे. तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ वाटेल. प्रॉपर्टीच्या विक्री-खरेदीसंदर्भात कोणतीही कारवाही सुरु असल्यास गंभीरपणे घ्या. नातं मजबूत ठेवण्यातही आपण विशेष योगदान द्याला.

घरात मुलाच्या कोणत्याही नकारात्मक कृतीबद्दल चिंता असेल. परंतु समस्या धैर्याने आणि संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. भाऊ किंवा मित्राला आपल्या मदतीची देखील आवश्यकता असू शकते.

व्यवसायात कोणत्याही प्रकारच्या भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे. परंतु त्याचवेळी कार्यस्थळाच्या अंतर्गत परिस्थितीत काही बदल आणण्याची आवश्यकता आहे. नोकरदारांना अवांछित काम मिळाल्यामुळे मन विचलित होईल.

✳️ लव्ह फोकस – पती-पत्नीच्या परस्पर सहकार्यामुळे कौटुंबिक वातावरण सुखद राहील. प्रेम प्रकरणातही गोडवा वाढेल.

✳️ खबरदारी – घसा आणि छातीत कफ संबंधित संसर्ग वाढू शकते. दिनचर्या संतुलित ठेवा आणि आयुर्वेदाचा वापरा करा.

लकी रंग – गुलाबी लकी अक्षर- स फ्रेंडली नंबर- 6

कन्या राश‍ी ( Virgo), 16 जून

दुपारी परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल असेल. दिवसाच्या सुरुवातीला आपल्या कार्याशी संबंधित रुपरेषा बनविणे चांगले. काही काळापासून सुरु असलेल्या तणावातूनही मुक्तता मिळेल. आपण ऊर्जा आणि आत्मविश्वास अनुभवाल.

मित्राशी वाद होऊ शकतो, संयमाने काम करा. घरातले कोणतेही महागडे इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा वाहन खराब झाल्याने मोठा खर्च होईल. प्रवास करताना खूप काळजी घ्या.

व्यवसायातील कामात सुधारणा होईल. काम करण्याची आपली आवड आपल्याला महत्त्वपूर्ण यश मिळवून देईल. विमा आणि कमिशनशी संबंधित व्यवसायात फायदेशीर परिस्थिती असेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल परंतु संथ गतीने.

✳️ लव्ह फोकस – वैवाहिक जीवन आणि प्रेम संबंध दोघेही सौहार्दपूर्ण असतील. भावनिक जवळीक देखील वाढेल.

✳️ खबरदारी – प्रकृती ठीक असेल. परंतु शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक रहाणे महत्वाचे आहे.

लकी रंग – पांढरा लकी अक्षर- प फ्रेंडली नंबर- 8

Leo/Virgo Daily Horoscope Of 16 June 2021 Sinha And Kanya Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | ‘या’ 4 राशीच्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती असते कमकुवत, लवकर आजारी पडतात, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल

Zodiac Signs | या 4 राशीचे व्यक्ती पुस्तक वाचण्याऐवजी चित्रपट पाहणे अधिक पसंत करतात

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?