Mangal Gochar 2023 : मंगळ ग्रहाची आता कन्या राशीसी गाठ, चार राशींच्या जीवनात होणार आर्थिक उलथापालथ
Mangal Gochar 2023 : ग्रहांची राशीचक्रातील स्थिती बदलली की त्याचा थेट परिणाम दिसून येतो. हा बदल कधी सकारात्मक तर कधी अडचणीत आणणारा असतो. आता मंगळ ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे चार राशींच्या अडचणीत वाढ होणार आहे.

मुंबई : ग्रह कमी अधिक कालावधीनंतर राशीचक्रातील आपलं स्थान बदलतात. स्थान बदलल्यानंतर त्या ग्रहांच्या दृष्टीकोनातून राशीचक्रावर परिणाम होत असतो. असं असलं तरी इतर ग्रहांची सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीही महत्त्वाची ठरते. मंगळ ग्रहाने सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश केला आहे. दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनी कन्या राशीत ठाण मांडलं आहे. राशीत मंगळ 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. त्यानंतर तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 47 दिवसांचा कालावधी काही राशींच्या जातकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तर काही राशींच्या जातकांना मंगळाची उत्तम साथ मिळणार आहे. मंगळाच्या गोचरामुळे मेष, मिथुनसहीत काही राशींना चांगली फळं मिळणार आहेत.
या राशीच्या जातकांच्या अडचणी वाढणार
वृषभ : या राशीच्या पाचव्या स्थानात मंगळ आला आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना संतान, शिक्षा आणि प्रेम संबंधात अडचणींचा सामना करावी लागू शकतो. त्यामुळे 47 दिवसांच्या कालावधीत या संबंधित गोष्टींकडे काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. धनहानी होण्याची शक्यताही या काळात आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. या सोबत तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह : या राशीच्या दुसऱ्या म्हणजे धनभावात मंगळ ग्रहाचं गोचर होणार आहे. त्यामुळे जातकांना संमिश्र अनुभूती मिळेल. कोणत्याही विषयावर बोलताना आपल्याकडून कोणी दुखावणार नाही ना याची काळजी घ्या. विनाकारण कोणाबाबतही अपशब्द वापरू नका. कुटुंबात काही कारणास्तव वाद होऊ शकतात. त्यामुळे डोकं शांत ठेवा.
कन्या : या राशीच्या लग्न स्थानात मंगळ असल्याने स्वभावात फरक दिसून येईल. चिडचिडेपणा वाढेल आणि आपलं म्हणणं खरं करण्याचा खटाटोप वाढेल. त्यामुळे अडचणीत वाढ होऊ शकते. आक्रमकपणा वाढल्याने वाद होतील. त्यामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. तसेच तब्येतीकडे लक्ष द्या.
कुंभ : या राशीच्या अष्टम स्थानात मंगळ गोचर करत आहे. त्यामुळे वडिलोपार्जित संपत्तीवरून भावकीत वाद होतील. इतकंच काय तर बहीण आणि भावासोबत पटणार नाही. काही कारणावरून वाद होतील. काही वाद न्यायलयाच्या दारात पोहोचतील. तसेच कठोर वाणीमुळे काही नाती तुटण्याची शक्यता आहे. वडिलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
