Palmistry: भाग्यशाली लाेकांच्या अंगठ्यावर असते हे चिन्ह, राजेशाही थाटात जगतात जिवन

| Updated on: Dec 27, 2022 | 3:55 PM

हस्तरेषाशास्त्रानुसार अंगठा हा व्यक्तीच्या तळहाताचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो.  अंगठ्याचा नीट अभ्यास केल्यास...

Palmistry: भाग्यशाली लाेकांच्या अंगठ्यावर असते हे चिन्ह, राजेशाही थाटात जगतात जिवन
हस्तरेषा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, हस्तरेषाशास्त्रात, (Palmistry) हस्तरेषा पाहून व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो. तळहातावर काही रेषा असतात ज्या सांगतात की, माणूस किती भाग्यवान आहे.  काही रेषा व्यक्तिची आर्थिक स्थिती देखील दर्शविते. या रेषा तुमच्या तळहातावर कुठे आहेत आणि त्या कशा ओळखायच्या त्याबद्दल जाणून घेऊया.

अंगठ्यावरून जाणून घ्या आर्थिक स्थिती

हस्तरेषा तज्ज्ञांच्या मते, ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रातील कुंडलीचे विश्लेषण ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते आणि प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रह महत्त्वाची भूमिका बजावतात, त्याचप्रमाणे हस्तरेषाशास्त्रानुसार अंगठा हा व्यक्तीच्या तळहाताचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो.  अंगठ्याचा नीट अभ्यास केल्यास त्या व्यक्तीचे जीवन, स्वभाव, मनःस्थिती आणि संपत्ती यांविषयी सहज माहिती मिळू शकते.

हस्तरेषा शास्त्रानुसार साधारणपणे दोन भाग अंगठ्यावर दिसतात. पण ज्यांच्या अंगठ्यावर तीन भाग असतात ते खूप भाग्यवान असतात. अंगठ्याचा पहिला भाग इच्छाशक्ती दर्शवतो. दुसरा ज्ञानाचा आणि तर्काचा तर तिसरा भाग अंतर्ज्ञानाचा आहे. कधी कधी या भागांवर काही चिन्ह असतात, त्याला यव म्हणतात. असं म्हणतात की अंगठा जितका मोठा तितकी शक्ती त्या व्यक्तीमध्ये असते.

हे सुद्धा वाचा

अंगठ्यावरील भाग्यशाली चिन्ह

  • हस्तरेषा शास्त्रानुसार तळहाताच्या तिसऱ्या भागावर म्हणजेच अंगठ्याच्या खालच्या भागात यवाचे चिन्ह दिसल्यास ते खूप शुभ मानले जाते. हे अंगठ्याच्यावर डोळ्याच्या खुणासारखे दिसते.
  • यवांची संख्या तीन असेल तर हा एक प्रकारचा राजयोग आहे. असे लोक खूप श्रीमंत असतात.
  •  जर हे चिन्ह संपूर्ण अंगठ्याभोवती असेल तर अशा व्यक्तीचे आयुष्य राजासारखे असते. अशा लोकांना जीवनात खूप मान आणि दर्जा मिळतो.
  • अंगठ्याचा आकार स्वभाव कसा आहे हे सांगतो.
  • हस्तरेखाशास्त्रातील तज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्याचा आकार त्याचा स्वभाव दर्शवतो. जर एखाद्या व्यक्तीचा अंगठा लांब असेल तर तो खूप बुद्धिमान असतो आणि व्यक्तिमत्व प्रभावशाली असते
  • दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीचा अंगठा उजव्या कोनात असेल तर तो कलाकार आणि भावनिक असतो.
  • अधिक कोनाचा अंगठा व्यक्तीला दिव्य बनवतो. असे लोकं नियंत्रण आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहेत.
  • जर एखाद्या व्यक्तीचा अंगठा लहान असेल तर तो चिडखोर आणि विक्षिप्त प्रकारचा असतो, अशा अंगठ्याचे लोकं कधीकधी गुन्हेगार देखील बनतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)