
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 07 December 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय ठेवा. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळेल.
काही कारणास्तव तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना बनवाल आणि या योजना यशस्वी होतील.
तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीची भेट होऊ शकते जी तुम्हाला मौल्यवान मदत करेल. तुमच्या व्यवसायात नफा होईल. कौटुंबिक कार्यक्रमात पैसे खर्च होऊ शकतात.
तुम्ही तुमच्या कामाकडे धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहाल. सहकाऱ्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कौटुंबिक खर्च वाढतील.
महत्वाच्या कामात तुमच्या वडिलधाऱ्यांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही सामाजिक कार्यांना पाठिंबा द्याल, ज्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
आज सुट्टी असूनही काम असल्यामुळे ऑफीसला याव लागले, पण वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुम्हाला पगारवाढाची चांगली बातमीही मिळू शकते. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. तुमच्या वरिष्ठांशी नीट, चांगलं. आदराने वागा.
खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज एक चांगला प्रोजेक्ट मिळू शकतो, जिथे तुम्ही तुमची प्रतिभा दाखवाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागू शकते.
कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बॉसकडून सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण फायदे मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात समन्वय चांगला राहील. तुम्हाला एखाद्याकडून आर्थिक फायदा मिळू शकतो.
आज तुमच्यासाठी यशाचा दिवस आहे. तुमचे सर्व काम पूर्ण होईल. आज तुम्हाला कामावर एक महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. सुट्टी असूनही कामामुळे धावपळ होईल.
कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला प्रेम आणि आदर मिळेल. आज घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला आध्यात्मिक कार्यांचा आनंद मिळेल. तुम्ही समाजसेवेसाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेत सामील होण्याचा विचार करू शकता. काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात.
तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडतील. विद्यार्थ्यांना सर्जनशील कामांमध्ये अधिक रस निर्माण होईल. लांबचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला फायदा होईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)