
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 1st January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असेल. नववर्षाच्या सुरूवातील तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. या राशीच्या विवाहित लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. सर्जनशील कामामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल.
बऱ्याच दिवसांपासून विचार करत होता त्या नियोजित कामाची आज सुरूवात कराल. तुमच्या मुलाच्या यशामुळे आनंद मिळेल. तुमचे वैवाहिक जीवन सुखाने भरलेले असेल. आज एका खास नातेवाईकाची भेट होईल.वर्षाच पहिला दिवस आनंदात जाईल.
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल. तुम्हाला उर्जेने परिपूर्ण वाटेल. आज तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम वेळेपूर्वी पूर्ण होईल. तुम्ही वैवाहिक संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न कराल.
आज मनासारखं काम होील, हमखास यश मिळेल. मित्रांसोबत एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज धैर्य आणि संयम वाढेल. जर कुटुंबात मतभेद असतील, तर ते आज संवादाने मिटतील. नवीन वर्षआंची सकारात्मक सुरूवात होईल.
आज कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. तसेच आर्थिक लाभाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. आज तुम्ही व्यवसायात उत्साहाने नव्या योजना अमलात आणाल, फायदा वाढेल.
अनेक दिवसांपासून रखडलेले काम आज पुन्हा सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. आज तुम्ही ऑफिसची प्रलंबित कामं पूर्ण करण्यावर भर द्याल, त्यामुळे खांद्यावरून मोठं ओझं उतरेल.
भागीदारीतील व्यवसायिक त्यांच्या पार्टनर्सशी व्यावसायिक बाबींवर चर्चा करण्यासाठी भेटतील. वाढत्या नफ्यामुळे कापड व्यापारी खूश होतील. आजची सुरूवात झोकात होील, मनासारखे निर्णय होतील.
सरकारी नोकरीवर असलेल्यांना पदोन्नती मिळाल्याने आनंद होईल. अपूर्ण आणि साहसी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका आणि महत्वाचे विचार त्यांच्याशी शेअर करणं टाळा.
सासरच्या घरी एखाद्या शुभ कार्यक्रमाची आयोजन केले जाईल, तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. कामावर यश मिळेल. विद्यार्थ्यांकडून झालेला थोडीशी निष्काळजीपणा निराशेला कारणीभूत ठरू शकतो; कठोर परिश्रम करत रहा.
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. तुमच्या व्यवसायात अडकलेले व्यवसायिक पैसे परत मिळू शकतात.
न्यायालयात चाललेल्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. आज अनपेक्षित घटनांपासून सावध रहा. सकारात्मक दृष्टिकोन राखल्याने तुम्ही हाती घेतलेले सर्व काही चांगले होईल याची खात्री होईल.
तुमच्या जुन्या समस्यांवर उपाय तुम्हाला सापडतील. तुम्ही एखाद्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकता. या राशीत जन्मलेल्या आणि नोकरी करणाऱ्यांना चांगल्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)