Astrology: या राशीच्या लोकांसाठी आज धनलाभाचा योग, परिस्थिती असेल तुमच्या नियंत्रणात

सामाजिक कामांमध्ये आज तुमचा सहभाग वाढेल. सावध राहा. सर्व क्षेत्रांमध्ये आज तुमचा बोलबाला असेल. काही क्षणी मात्र सावध राहा. कुटुंबाकडून सहकार्य मिळणार आहे. कुटुंबियांच्या आनंदानं आज तुम्हाला सुखानुभव मिळणार आहे. आपल्या माणसांच्या शिकवणुकीतून पुढे जा.

Astrology: या राशीच्या लोकांसाठी आज धनलाभाचा योग, परिस्थिती असेल तुमच्या नियंत्रणात
आजचे राशी भविष्य
नितीश गाडगे

|

Aug 03, 2022 | 7:47 AM

 1. मेष- नात्यांवर विश्वास ठेवा. आज बिघडलेली नातीही मार्गी लागणार आहेत. कोणा एका व्यक्तीची खास मदत होणार आहे.
 2. वृषभ- अफवांवर विश्वास ठेवू नका. नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवा. तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.
 3. मिथुन- काही खास गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची तुमची क्षमता वाढेल. भावनात्मक निर्णय घेण्यामध्ये घाई करू नका. वेळेला महत्त्व द्या.
 4. कर्क- सामाजिक कामांमध्ये आज तुमचा सहभाग वाढेल. सावध राहा. सर्व क्षेत्रांमध्ये आज तुमचा बोलबाला असेल. काही क्षणी मात्र सावध राहा.
 5. सिंह- कुटुंबात सुखशांती नांदेल. इतरांशी विनम्रतेनं वागा. आरोग्याची काळजी घ्या.
 6. कन्या- आज तुमच्याप्रती इतरांच्या मनात असणारी आदराची भावना वाढेल. व्यवसायात लक्ष द्या नफा होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जा.
 7. तुळ- शुभकार्यांसाठी खर्च कराल. परिस्थिती तुमच्या नियंत्रणार असेल. पैशांच्या व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगा. तुमची मूल्य सोडू नका.
 8. वृश्चिक- अडकलेली आर्थिक कामं मार्गी लावा. विचारपूर्वक कामं करा. करिअरमध्ये मोठे निर्णय घ्याल. फक्त अतिविचार टाळा.
 9. धनू- सुखसंपत्तीनं घरात आनंदाची बरसात होणार आहे. सर्वजण तुमचं समर्थन करणार आहेत. आर्थिक विषयांवर भर द्या.
 10. मकर – दीर्घकालीन कामं पूर्ण करा. आज अडकलेली कामं मार्गी लागतील. अनेक विषय तुम्ही चपळाईनं हाताळाल. कार्यक्षमता वाढेल.
 11. कुंभ – कुटुंबाकडून सहकार्य मिळणार आहे. कुटुंबियांच्या आनंदानं आज तुम्हाला सुखानुभव मिळणार आहे. आपल्या माणसांच्या शिकवणुकीतून पुढे जा.
 12. मीन- देवाणघेवाणीच्या व्यवहारांमध्ये सकारात्मक बदल होणार आहेत. विचारांनी आज तुम्ही प्रगल्भ व्हाल असे प्रसंग निर्माण होणार आहे. धनलाभाचा योग आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें