AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solar Eclipse 2023 : वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण या राशीच्या लोकांसाठी घेऊन येणार सूवर्ण संधी, धनलाभाचे योग

धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण दिसत नसले तरी त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव राशींवर पडतो. त्यामुळे ज्या राशींवर ग्रहणाचा विपरित परिणाम होतो त्यांनी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.

Solar Eclipse 2023 : वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण या राशीच्या लोकांसाठी घेऊन येणार सूवर्ण संधी, धनलाभाचे योग
सूर्यग्रहणImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 08, 2023 | 3:10 PM
Share

मुंबई :  शास्त्रज्ञांसाठी ग्रहण ही केवळ एक खगोलीय घटना मानली जाते, परंतु धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण दिसत नसले तरी त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव राशींवर पडतो. त्यामुळे ज्या राशींवर ग्रहणाचा विपरित परिणाम होतो त्यांनी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. 2023 वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse 2023) आणि चंद्रग्रहण दोन्ही ऑक्टोबरमध्ये होणार आहे. 14 ऑक्टोबरला सूर्यग्रहण तर 29 ऑक्टोबरला चंद्रग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 4 राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण खूप शुभ असणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

या राशीच्या लोकांना होणार लाभ

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी वर्षातील दुसरे सूर्यग्रहण शुभ राहील. करिअरमध्ये मोठी प्रगती करू शकता. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मानसिक समाधान मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची दाट शक्यता आहे.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. तुमच्या जोडीदाराची मदत तुम्हाला यश मिळवून देईल. मुलांच्या कार्याने मन प्रसन्न राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेली कोणतीही समस्या दूर होईल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण शुभ असू शकते. या काळात पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. कामात यश मिळू शकते. नशिबाच्या मदतीने संपत्ती मिळू शकते. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण शुभ राहील. या काळात आत्मविश्वास वाढू शकतो. जवळच्या नातेवाईकांसोबतच्या नात्यात गोडवा येईल. आधी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.