AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Gochar 2022: पुढील आठवड्यात सूर्य देव करणार स्वराशीत संक्रमण, या राशींचे बदलणार भाग्य

सूर्य देव वर्षभरानंतर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे संक्रमण 17 ऑगस्ट 2022 रोजी बुधवारी सकाळी 7.14 वाजता होईल. 17 सप्टेंबर 2022 पर्यंत सूर्य या सिंह राशीत राहील, त्यानंतर पुढील राशीत त्याचे संक्रमण सुरू होईल.

Surya Gochar 2022: पुढील आठवड्यात सूर्य देव करणार स्वराशीत संक्रमण, या राशींचे बदलणार भाग्य
सूर्य गोचर
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 12, 2022 | 7:23 AM
Share

Surya Gochar 2022: ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य हा सर्वात शक्तिशाली आणि फल देणारा मानला जातो. ज्याच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो, शनिसारखा (snani) अशुभ ग्रहही त्याचे कुठलेच नुकसान करू शकत नाही. म्हणून, जन्म पत्रिका पाहताना, सर्वप्रथम, सूर्याची स्थिती आणि त्याची शक्ती पाहिली जाते. सूर्य सिंह राशीचा (Leo Zodiac) स्वामी आहे. मेष राशी ही सूर्याची उच्च राशी आहे आणि तूळ ही त्याची दुर्बल राशी आहे. सूर्य कधीही मागे जात नाही आणि एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी त्याला सुमारे 30 दिवस लागतात. सूर्याचे संक्रमण निसर्गापासून मानवापर्यंत प्रत्येकामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणते. चांगली गोष्ट म्हणजे वर्षभरानंतर सूर्य पुन्हा एकदा स्वतःच्या राशीत भ्रमण करणार आहे. त्यामुळे बलवान सूर्य अनेक राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल.

सूर्य संक्रमण

सूर्य देव वर्षभरानंतर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे संक्रमण 17 ऑगस्ट 2022 रोजी बुधवारी सकाळी 7.14 वाजता होईल. 17 सप्टेंबर 2022 पर्यंत सूर्य या सिंह राशीत राहील, त्यानंतर पुढील राशीत त्याचे संक्रमण सुरू होईल. म्हणजेच 17 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर हा संपूर्ण महिना अनेकांसाठी खूप शुभ परिणाम देणारा असेल. या संक्रमणाच्या अनेकांना अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे, परंतु ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याची स्थिती अनुकूल आहे, त्या राशीच्या लोकांना खूप सकारात्मक परिणाम मिळतील.

बनत आहेत शुभ योग

17 ऑगस्ट रोजी, जेव्हा सूर्य देव कर्क राशीतून त्याच्या स्वतःच्या राशीत, सिंह राशीत प्रवेश करेल, तेव्हा वृषभ राशीमध्ये उपस्थित असलेल्या मंगळाची चौथी दृष्टी सूर्यावर पडेल. सूर्य आणि मंगळ हे दोन्ही अग्नि तत्वाचे ग्रह असल्यामुळे, सूर्यावरील मंगळाच्या या पैलूचा प्रभाव जातकांच्या  उर्जेमध्ये प्रचंड वाढ करेल. दुसरीकडे, सूर्याचा सिंह राशीमध्ये आधीपासूनच विद्यमान बुधाशी शुभ संयोग असेल, ज्याला बुधादित्य योग म्हणतात. या योगामुळे व्यक्तीला विद्या, बुद्धी आणि वाणीच्या क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी आणि मान-सन्मान मिळेल. काही दिवसांनंतर म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी भौतिक सुखांची देवता आणि शुभ ग्रह शुक्र देखील सिंह राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत, हे संयोजन सिंह राशीसाठी  शुभ सिद्ध होऊ शकते.

  1. मेष- सूर्याचे हे संक्रमण तुमच्या पाचव्या भावात म्हणजेच शिक्षण, संतती, विद्या-बुद्धी आणि प्रेम-संबंध यावर परिणाम करेल . पंचमेश सूर्य तुमच्यासाठी खूप शुभ आहे आणि तुम्हाला सर्व क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. मुलाला चांगली नोकरी, परदेशात शिक्षण किंवा शैक्षणिक क्षेत्रात पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. संशोधन, अध्यापन, माध्यम, सल्लागार इत्यादी क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. आर्थिकदृष्ट्याही पैशाचा ओघ चांगला राहील. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारतील.
  2. सिंह- सूर्य तुमच्याच राशीत भ्रमण करेल, त्यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. तुम्ही सर्व काम पूर्ण समर्पण आणि उत्साहाने पूर्ण कराल आणि त्याचे फळ तुम्हाला मिळेल. तुमचे शरीर निरोगी राहील आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. उत्साह आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले काम करताना दिसतील. तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि मेहनतीचा आदर होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान