Shani Upay : शनीचा प्रकोप! शनिवारी ‘या’ गोष्टी केल्यास भासेल पैशांची तंगी, संपत्तीवरही येईल गदा

Shani Upay : ज्योतिषशास्त्रात, शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश असे म्हटले जाते. जर तुम्ही चुकूनही या पाच गोष्टी केल्यात तर शनिदेव तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे.

Shani Upay : शनीचा प्रकोप! शनिवारी या गोष्टी केल्यास भासेल पैशांची तंगी, संपत्तीवरही येईल गदा
Shani Dev
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Mar 15, 2025 | 2:37 PM

शनिवार हा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी समर्पित केला जातो. आज देखील शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की, शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार योग्य ते फळ देत असतात. त्यामुळे शनिदेव ज्यांच्यावर प्रसन्न होतात त्यांचे नशीब फळफळते. जर एखाद्या व्यक्तीवर शनीची अशुभ सावली एखाद्या व्यक्तीवर पडली तर त्याला कोणत्याही कामात यश मिळत नाही. त्याच्या पदरात सतत निराशा पडते. शनिदेवाच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी तुम्ही देखील या पाच गोष्टींची काळजी घेऊ शकता. या पाच गोष्टी चुकूनही शनिवारी करु नका.

शनीची वाईट नजर टाळण्यासाठी उपाय

मद्यसेवन मांसाहार टाळा

शनिवारी किंवा अमावस्येला मद्यपान करणाऱ्यांना तसेच मांसाहार करणाऱ्यांना शनिदेव कधीही माफ करत नाहीत. अशा लोकांवर शनीची महादशा वर्चस्व गाजवते. त्यांना प्रत्येक पावलावर अपयशाला सामोरे जावे लागते आणि घरात कलह वाढतो.

मुक्या प्राण्यांना मारू नका

शास्त्रात असे म्हटले आहे की जे लोक मुक्या प्राण्यांना विशेषतः कुत्र्यांना मारतात, त्यांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. असे लोकं कधीच सुखी राहू शकत नाहीत आणि त्यांना अनेक दुःखांना सामोरे जावे लागते. त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

वाचा: होळीनंतर ‘या’ तीन राशींना लागणार लॉट्री! चंद्र-शुक्राच्या कृपेने होणार गडगंज श्रीमंत

अस्वछतेपासून दूर राहा

ज्योतिषांच्या मते जे लोकं अस्वच्छ राहतात किंवा घाण पसरवतात त्यांना शनिदेवाची कृपा कधीच मिळत नाही. अशा लोकांना नेहमी शनीच्या कोपाचा सामना करावा लागतो आणि त्यांना नेहमी पैशाची तंगी, आजारपण आणि त्रास सहन करावा लागतो.

मोठ्यांचा अपमान करू नका

धार्मिक विद्वानांच्या मते, ज्या घरात वडीलधाऱ्यांचा अपमान होतो तिथे शनि दोष सुरू होतो. अशा लोकांच्या घरातील संपत्ती संपत्ती ओसरू लागते आणि कुटुंबातील सदस्य कर्जाच्या जाळ्यात गुरफटत राहतात. त्यामुळे कधीही मोठ्यांचा अपमान करू नका. त्यांचा आदर करायला शिका.

पिंपळाचे झाड तोडू नका

सनातन धर्मात पिंपळाचे झाड सर्वात पवित्र आणि पूजनीय मानले गेले आहे. असे म्हणतात की जे पीपळाचे झाड तोडतात किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान करतात त्यांना त्याचा फटका सहन करावा लागतो. अशा लोकांवर शनिदेवाचा कोप होतो आणि त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)