होळीनंतर ‘या’ तीन राशींना लागणार लॉट्री! चंद्र-शुक्राच्या कृपेने होणार गडगंज श्रीमंत
Chandra Shukra Yuti 2025 : होळीनंतर चंद्र देवाचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे याचा तीन राशींवर चांगला परिणाम होणार आहे. आता या तीन राशी कोणत्या जाणून घेऊया...

Chandra Shukra Yuti 2025 : आज, १४ मार्च रोजी संपूर्ण देशात होळी ही मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, होळीच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच १७ मार्च रोजी चंद्र देव तुळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे शुक्र आणि चंद्र देवाची युती निर्माण होणार आहे. या युतीमुळे काही राशींचा फायदा होणार आहे. आता कोणत्या तीन राशींचा फायदा होणार आहे चला जाणून घेऊया…
मिथुन
चंद्र देव आणि शुक्राची युती ही मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात शुभ गोष्टी घडणार आहेत. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस सुरु होणार आहेत. या राशींच्या लोकांनी सुरु केलेल्या व्यवसायातून प्रचंड पैसा मिळणार आहे. तसेच प्रगतीच्या नव्या संधी देखील प्राप्त होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अपुऱ्या असलेल्या तुमच्या आर्थिक इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात दुसऱ्या सदस्यांचे सहकार्य लाभेल. धन स्थिती उत्तम राहील.




वाचा: मार्च महिन्यात शनिच्या साडेसातीपासून ‘या’ राशींची होणार सुटका! तर ‘या’ राशींची वाढणार डोकेदुखी
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र देव आणि शुक्राच्या युतीचा फायदा हा कर्क राशीच्या लोकांना देखील होणार आहे. या राशींच्या जीवनात आनंद येणार आहे. धन संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अपेक्षा असलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात कौतुक होणार आहे. तुमचे शुभ चिंतक सोबत असणार आहेत. मात्र, तुमच्यावरील जबाबदारीमध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभाच्या भरपूर संधी मिळू शकतात. तुम्ही करत असलेले नवे प्रयोग फलदायी ठरणार आहेत.
तुळ
चंद्र देव आणि शुक्राच्या युतीचा फायदा हा तुळ राशीच्या लोकांना देखील होणार असल्याचे ज्योतिषशास्त्रामध्ये लिहिले आहे. या राशीच्या लोकांचा जवळचा प्रवास घडणार आहे. या प्रवासातून चांगले परिणाम दिसू लागतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवी नोकरी मिळणार आहे. कौटुंबिक सुख लाभणार आहे. व्यावसायिकांना धन लाभाच्या अनेक संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. मानसिक स्थिती अतिशय उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकते. जमीनीशी संबंधीत असलेले व्यवहार मार्गी लागणार आहेत. त्यामुळे त्यातून आर्थिक लाभ होऊ शकतो. लांबच्या प्रवासाचे योग जुळून येतील. आर्थिक स्थैर्य लाभेल.