Today Rashi Bhavishya : या राशींच्या इच्छा होणार पूर्ण, तर काहींना खर्चावर ठेवावे लागणार नियंत्रण; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today Saturday 7 November 2026: आजचा दिवस काही राशींसाठी आनंद आणि प्रगतीच्या नव्या संधी घेऊन येईल, तर काहींना आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा सर्व १२ राशींवर कसा परिणाम होईल आणि कोणाला मिळणार नशिबाची साथ, जाणून घ्या.

Today Rashi Bhavishya : या राशींच्या इच्छा होणार पूर्ण, तर काहींना खर्चावर ठेवावे लागणार नियंत्रण; वाचा आजचे राशीभविष्य
Astrology
| Edited By: | Updated on: Nov 07, 2026 | 6:00 AM

आज, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी शनिवार असून दिवाळीच्या उत्सवातील नरक चतुर्दशी आहे. काही भागांमध्ये याला काली चौदस, तर काही ठिकाणी छोटी दिवाळी असेही म्हटले जाते. अभ्यंगस्नान, घरात दिव्यांची आरास आणि धार्मिक विधी यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक उत्साहासोबतच ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचाही सर्व राशींवर परिणाम होणार असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते.

काही राशींच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात, तर काहींना आरोग्य, खर्च आणि नातेसंबंधांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. चला तर जाणून घेऊया, शनिवारचा दिवस मेष ते मीन या सर्व १२ राशींसाठी कसा असेल.

Loading...

मेष

मन शांत राहील. विचारांमध्ये स्पष्टता येईल. कामात हळूहळू सुधारणा होईल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला महत्त्वाच्या कामात उपयोगी ठरेल. थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते.

वृषभ

मनात नवीन कल्पना आणि योजनांना सुरुवात होईल. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून कामात मदत मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळेल. उत्पन्न चांगले राहील. खर्चावर नियंत्रण ठेवता येईल.

मिथुन

कामाचा ताण वाढेल. मात्र जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहील. मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आरोग्याच्या बाबतीत थकवा, कंबर किंवा पाय दुखण्याची शक्यता असल्याने विश्रांती घ्या.

कर्क

नशिबाची साथ मिळेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. शिक्षण, प्रवास किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी संधी मिळेल. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल राहिल.

सिंह

मन काहीसे अस्वस्थ राहू शकते. जुन्या आठवणी किंवा पूर्वीच्या काही गोष्टी मनात येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचा विश्वास मिळेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

कन्या

नवीन लोकांशी संपर्क साधल्याचा फायदा होईल. नोकरी किंवा व्यवसायात एखादी नवीन संधी मिळेल. एकाच वेळी अनेक गोष्टी मनात सुरू असल्याने महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नका. पुरेशी झोप घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ

नातेसंबंधांच्या बाबतीत दिवस चांगला राहिल. जुन्या मतभेदांवर चर्चा करून तोडगा काढण्याची संधी मिळेल. कामात योग्य समतोल राखल्यास फायदा होईल. नवीन प्रस्ताव किंवा जबाबदारी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील.

वृश्चिक

कामात स्थिरता राहील. बऱ्याच काळापासून करत असलेल्या मेहनतीचे परिणाम आता दिसू लागतील. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. घराशी संबंधित एखादे काम पूर्ण होईल. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने अनावश्यक खरेदी टाळा.

धनु

कामात चांगले लक्ष लागेल. रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते. प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणे टाळा. कामावर लक्ष केंद्रित करा. पोटाशी संबंधित त्रास, गॅस किंवा थकवा जाणवू शकतो.

मकर

आत्मविश्वास वाढलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व मिळेल. कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. खर्च वाढू शकत असल्याने पैशांचे योग्य नियोजन करा. स्ट्रेस घेणे टाळा.

कुंभ

छोट्या गोष्टींचाही मनावर परिणाम होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये तुमची भूमिका राहील. काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आरोग्यासाठी झोप, पोट आणि मानसिक ताण याकडे लक्ष द्या.

मीन

नवीन गोष्टी शिकण्याची आणि अभ्यास करण्याची इच्छा होईल. मात्र, कामात लक्ष विचलित होऊ शकते किंवा एखाद्या गोष्टीवरून राग येऊ शकतो. बोलताना शब्द जपून वापरा. नोकरीत बदल, बदली किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. उत्पन्नात हळूहळू वाढ होऊन आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us