AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 22 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांना चांगल्या विचारांचा लाभ होईल

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांचे उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहिल.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 22 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांना चांगल्या विचारांचा लाभ होईल
राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Feb 22, 2023 | 12:12 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे राशी भविष्य

मेष

दिनमान लक्ष्मीप्रद आहे. व्यापारात नवीन योजना आमलात आणा. आर्थिक व्यवहाराकरीता उपयोगी दिवस राहिल. मंगलकार्येही घडतील धार्मिक कार्य वास्तुप्रवेश आणि प्रवास या दृष्टीने योग्य काळ आहे. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहिल. शत्रुवर सरशी राहील. उर्जावान व आविश्वासपूर्ण दिवस राहिल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. जनसंपर्क वाढेल. नवीन प्रकल्प पुर्णत्वास जातील.

वृषभ

प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात रममाण व्हाल. जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत प्रमोशनची शक्यता असून व्यवसायात असणाऱ्यांची चांगली उन्नती होईल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल रहिल.

मिथुन

नोकरीत बदली किंवा बढ़ती मिळण्याचा योगत आहे. वेतनवाढ होईल. अडकलेली रक्कम मिळेल. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलागुणांसाठी चांगले वातावरण आहे. आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. व्यापारात आर्थिक उन्नती होईल. बौद्धिक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा उंचावेल. संततीकडून शुभवार्ता समजतील. विधायक कार्याची मुहूर्तमेढ करू शकाल. नवीन उपक्रम राबवु शकला. घरगुती वातावरण चांगले राहिल. उन्नतीकारक कारक दिवस असेल.

कर्क

शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. विरोधक कारवाया करण्याची संधी सोडणार नाहीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. भावडांशी संबध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. व्यापारात आकस्मित हानी संभवते. कामगारावर सर्वस्व अवलंबुन राहू नका. अनपेक्षित हानी होईल. कौटुंबिक जिवनात बोलण्यावर नियंत्रण ठेवून कटुता टाळा. मानसिक ताणतणावामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. अपघात भय संभवते.

सिंह

परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. संशोधनात्मक कार्य आपल्या हातुन घडेल. मानसन्मान वाढीस लागेल.

कन्या

रोजगारात आपल्या विरोधात गैरसमज किंवा निंदानालस्ती होण्याची संभावना आहे. शत्रु गुप्तशत्रुचा त्रास वाढेल. दिनमान अनिष्ठ असल्याने मनाची चलबिचल अस्थिरता वाढेल. व्यापारात मोठी गुंतवणूक नवीन योजना राबवू नका. कायदा व नियमच्या विरोधात काम केल्यास शिक्षा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर एखादी अप्रीय घटना घडेल. नेहमीच्या कामात खुप मेहनत घ्यावी लागेल. जुन्या प्रॉपर्टीचा प्रश्न अचानक उद्भभवेल. आपल्या हातून वाईट अनैतिक कृत्य होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

तुला

आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक संकटाना तोंड द्याल. काम विचार पुर्वक करा. रोजगारात विरोकावर मात करण्यात यशस्वी व्हाल. आपले कर्तुत्व उजाळून निघेल. रचलेले डावपेच यशस्वी होतील. व्यापारात फायदा होऊन समाजात मानसन्मान वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल. कर्जप्रकरणे मंजुर होतील.पैशाची आवक पेक्षा खर्चाचे प्रमाण त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कौटुंबिक पातळीवर उत्साहाचे वातावरण राहील. आजचाच दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल.

वृश्चिक

रोजगारात आपले कर्तुत्व सिद्ध कराल. कामात पत वाढेल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. काहींना प्रमोशन मिळण्याची किंवा वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगली प्रगती होईल. नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल. संतती संबंधी शुभवार्ता समजतील. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल. बेरोजगारांना रोजगार मिळतील. आंनदायक दिवस राहील.

धनू

रोजगारात नवीन काम यशस्वीरित्या पार पाडातल. आत्मविश्वासाने काम केल्यास कामात प्रगती राहील. सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. वारसाहक्कातुन प्रॉपर्टीचा लाभ होईल. वाहन घर खरेदीचा योग आहे. भाऊबहिणीकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवन सुखकारक राहिल. संततीकडून शुभवार्ता मिळतील. नवीन संबंध कायदेशीर ठरतील. आपल्या कार्यक्षेत्रात इतरांकडे निष्कारण संशयाने पाहू नका. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. आनंददायक वातावरण राहिल.

मकर

मन उदारमतवादी राहील. कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल. नोकरी व्यवसायात प्रगती होण्याचे योग अजून काहीना प्रमोशन मिळेल. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना बलीना मोठे यश प्राप्त होईल. नातेवाईकाकडून सहकार्य लाभेल.

कुंभ

मोठ्या व्यक्तींच्या संबंधामुळे आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. शासकीय कामकाजात यश येईल. आपल्या कार्यक्षेत्रात श्रेष्ठ परिमाणाची अपेक्षा केल्यास वावगे ठरणार नाही. नवीन संधी प्राप्त होतील. गुरूबल उत्तम असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. आर्थिक स्थिती चांगली राहिल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. नोकरीत महत्वाची जबाबदारी मिळू शकते. कौटुंबिक पातळीवर वादविवाद टाळावेत. महत्वाची कागदपत्रे हाताळताना काळजी घ्यावी.

मीन

रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका.व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका. अन्यथा फसवणुक होईल.उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहिल. आधात्म शास्त्राची आवड निर्माण होईल. कुटुंबाच्या सदस्याच्या सदस्याच्या विरोधात जाऊन निर्णय घेऊ नयेत. आरोग्याची काळजी घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.