AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुडत्याला काठीचा आधार! गुरुच्या राशीत सूर्य आणि बुधाची युती, तीन राशींना होणार फायदा

बुध आणि सूर्याची युती शुभ योग तयार करत आहे. ज्योतिषशास्त्रात या योगाचं खूप महत्त्व आहे. या शुभ योगामुळे तीन राशीच्या जातकांना विशेष फायदा होणार आहे.

बुडत्याला काठीचा आधार! गुरुच्या राशीत सूर्य आणि बुधाची युती, तीन राशींना होणार फायदा
बुधादित्य योगामुळे तीन राशींचं नशिब फळफळणार, अडचणीच्या काळात मिळणार दिलासा
| Updated on: Mar 08, 2023 | 12:25 PM
Share

मुंबई : ग्रहांचं आणि आपलं वेगळं नातं असतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. आपल्या बाजूने कोणते ग्रह आहेत यावरून आयुष्य जगावं लागतं. तसेच ज्या ग्रहांची बाजू कमकुवत अशा ग्रहांची शांती करावी लागते. म्हणजे ग्रहांच्या वागण्यात तसा सौम्यपणा येतो. तुमच्या जन्माच्या वेळी असलेली ग्रहांची स्थिती आणि ग्रहांचा रोज होणारा गोचर यात सकारात्मकता जुळून आली की चांगले दिवस अनुभवायला मिळतात. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीकडे ज्योतिष लक्ष लावून असतात. अशीच सूर्य आणि बुधाची जोडी सकारात्मक योग जुळवून आणत आहे. या योगाला ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग असं संबोधलं जातं. या योगामुळे सर्वच राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. पण तीन राशींना सर्वाधिक फायदा होईल.

तीन राशीच्या लोकांना होणार फायदा

वृषभ – या राशीच्या उत्पन्न भावात बुधादित्य योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना निश्चितच फायदा होईल. या काळात उत्पन्नात वाढ होईल. तसेच जुन्या गुंतवणुकीतूत धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. त्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. आर्थिक स्थिती सुधारल्याने कौटुंबिक वातावरणही चांगलं राहणार आहे. लग्न न झालेल्यांसाठी या काळात योग्य स्थळ चालून येईल. तर लग्न झालेल्या जोडप्यांना या काळात गुड न्यूज मिळू शकते. आरोग्यही या काळात उत्तम राहील.

मिथुन – या राशीच्या कर्मभावात सूर्य आणि बुधाची युती होत आहे. त्यामुळे 16 मार्चपासून या राशीच्या जातकांना चांगले दिवस अनुभवयला मिळतील. राजकारणाशी निगडीत लोकांना मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. तसेच मोठं पद मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळेल. तसेच नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळून शकते. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ सुगीचा असेल. जुनाट आजारातून दिलासा मिळू शकतो.

कर्क – या राशीच्या भाग्य स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. नशिबाच्या घरात दोन ग्रह एकत्र येत असल्याने अचानक धनलाभ होऊ शकतो. म्हणजेच नशिबाची साथ मिळेल. ज्या कामात हात टाकाल ते काम पूर्ण होईल. तसेच जुन्या काही इच्छा असतील त्याही मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. वडिलांसोबतचे संबंध आणखी दृढ होतील. आरोग्याच्या समस्येकडे या काळात दुर्लक्ष करू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी