Vastu Tips : सोपे पण अत्यंत प्रभावी आहेत वास्तूशास्त्रातले हे उपाय, दूर होते सर्व नकारात्मकता

हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात (VastuShastra) घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत. वास्तूच्या नियमांचे (Vastu Tips) पालन केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि त्याचबरोबर शांती आणि समृद्धी नांदते.

Vastu Tips : सोपे पण अत्यंत प्रभावी आहेत वास्तूशास्त्रातले हे उपाय, दूर होते सर्व नकारात्मकता
वास्तू उपायImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 6:35 PM

मुंबई : आयुष्यात सर्व सुखसोयी मिळाव्यात आणि आनंदी जीवन जगावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकजण खूप मेहनत आणि प्रयत्न करतो,  मात्र प्रत्येकालाच यश मिळते असे नाही. काहींना मेहनत करूनही पदरी निराशा पडते तर काहींना यश मिळूनही त्याचा उपभोग घेता येत नाही. जर तुमच्या आयुष्यात अचानक आनंदाला ग्रहण लागले असेल तर ते दूर करण्यासाठी खाली दिलेल्या पाच तत्वांवर आधारित वास्तु उपाय (Vastu Tips) खूप प्रभावी ठरू शकतात.

1. या दिशेची विशेष काळजी घ्या

वास्तूनुसार ज्या व्यक्तीला सुख-समृद्धीची इच्छा असते त्यांनी आपल्या घराच्या ईशान्य दिशेची विशेष काळजी घ्यावी. वास्तूमध्ये देवाच्या पूजेसाठी ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते. अशा परिस्थितीत या दिशेला कधीही घाण किंवा कचरा टाकू नये. वास्तूनुसार या दिशेची जमीन खडबडीत किंवा उंच किंवा सखल नसावी. वास्तूनुसार तुमच्या घराची पूजेची खोली नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावी.

2. पाण्याचा प्रवाह या दिशेने ठेवा

वास्तूनुसार घरामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे कधीही उतार किंवा पाण्याचा प्रवाह नसावा. वास्तूनुसार घरातील पाण्याचा निचरा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा.

हे सुद्धा वाचा

3. दक्षिण दिशेचा वास्तु नियम

वास्तूनुसार घराचा ईशान्य भाग खुला ठेवला पाहिजे, घराचा दक्षिणाभिमुख भाग नेहमी उंच ठेवावा. ही दिशा पितरांसाठी मानली जाते, अशा प्रकारे आपल्या घरातील दिवंगत लोकांचा फोटो या दिशेच्या भिंतीवर लावावा.

4. पाण्याशी संबंधित वास्तूदोष

वास्तूनुसार घरामध्ये पाण्याशी संबंधीत ठिकाणी कोणताही दोष नसावा. वास्तूनुसार तुमच्या घरातील नळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून पाणी गळत असेल तर त्याच्या दोषामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. असे दोष लवकर दूर केले पाहिजेत.

5. मुख्य दरवाजा कसा असावा

वास्तूनुसार, सुख आणि संपत्तीची देवी घराच्या प्रवेशद्वारातून तुमच्या घरात प्रवेश करते, त्यामुळे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि सुसज्ज ठेवा. वास्तूनुसार ज्यांना सुख-संपत्तीची इच्छा असते, त्यांनी घराच्या प्रवेशद्वाराशी संबंधित काही दोष असल्यास ते त्वरित दूर करावे.

6. घराच्या छताचा वास्तु नियम

वास्तूनुसार घराच्या छतावर कधीही रद्दी ठेवू नये, तसेच छतावर काटेरी झाडे लावू नयेत. असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घराच्या छताची जागा उत्तर-पूर्व दिशेला मोकळी आणि रिकामी असावी. छत नेहमी स्वच्छ ठेवावे.

7. स्वयंपाकघर कुठे आणि कसे असावे

वास्तूनुसार घरामध्ये स्वयंपाकघर बनवताना नेहमी वास्तु नियमांची काळजी घ्या. वास्तूनुसार यासाठी सर्वात शुभ दिशा दक्षिण-पूर्व आहे. वास्तूनुसार, चांगले आरोग्य आणि सौभाग्य मिळविण्यासाठी या दिशेला बनवलेल्या स्वयंपाकघरातील शेगडी देखील दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.