शनि जयंतीला साडेसाती असणाऱ्या राशीच्या लोकांनी या ठिकाणी लावा दिवा; साडेसातीचा प्रभाव कमी होण्यास होईल मदत
27 मे 2025 रोजी शनि जयंती आहे. आणि ही जयंती ज्येष्ठ अमावस्या आणि मंगळवार या दुर्मिळ संयोगाने येत आहे. या रात्री विशिष्ट ठिकाणी दिवे लावल्याने शनिदेव, पूर्वज आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं. पाहुयात मग या दिवशी कोणत्या तेलाचे दिवे आणि कुठे लावावे.

शनि जयंती 27 मे 2025 रोजी ज्येष्ठ अमावस्या आणि मंगळवार या दुर्मिळ संयोगाने येत आहे. या रात्री विशिष्ट ठिकाणी दिवे लावल्याने शनिदेव, पूर्वज आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. हा दिवस साडेसतीमुळे पीडित असलेल्यांसाठी तो त्रास कमी करण्याची चांगली संधी आहे.
या ठिकाणी लावावेत दिवे
शनि मंदिरात लावा दिवा
शनि जयंतीला शनि मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनिदेवाला तेलाने स्नान घातल्यानंतर शनि चालीसा किंवा शनि स्तोत्राचे पठण करावं. या उपायामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होण्यास मदत होते आणि शनिदेवांचे आशीर्वादही मिळतात.
भैरव मंदिरात दिवा
मंगळवारी शनि जयंती असल्याने भैरव मंदिरातही मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप फलदायी ठरते. भगवान भैरवांची पूजा करून त्यांच्यासमोर दिवे लावल्याने शनिदेवांची कृपा लाभते. हा उपाय विशेषतः साडेसाती असणाऱ्या राशींच्या लोकांनी करणे अधीक फलदायी ठरेल.
पिंपळाच्या झाडाखाली दिवा
साडेसतीने ग्रस्त असलेल्यांनी शनि जयंतीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनि स्तोत्राचा पाठ करा. असे मानले जाते की या उपायामुळे मानसिक ताण आणि आर्थिक समस्या कमी होतात आणि पूर्वजांकडून आशीर्वाद देखील मिळतो.
भगवान हनुमान यांच्यासमोर दिवा
शनि जयंतीला हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावून सुंदरकांड किंवा बजरंग बाण पाठ करणे चांगले आहे. हनुमानजींची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि साडेसातीचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते. मंगळवारचा योगायोग या उपायाला अधिक शक्तिशाली बनवतो.
घरी तुपाचा दिवा लावा
शनि जयंतीच्या रात्री घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावा. असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. शनिदेव प्रसन्न होतात आणि सुख आणि शांती प्रदान करतात.
जलाशयात प्रकाशयोजना
शनि जयंती ज्येष्ठ अमावस्येला येते. या रात्री कोणत्याही नदी किंवा तलावात दिवे वाहणे शुभ मानले जाते. हा उपाय पूर्वजांना प्रसन्न करतो आणि कुटुंबाला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतो. मोहरीच्या तेलाचा दिवा विशेषतः शुभ मानला जातो.
