सत्तेच्या लालसेपोटी दत्तक मुलाशीही अनैतिक संबंध, राणी चिंग शी नेमकी कोण आहे ?

| Updated on: Oct 17, 2021 | 10:24 PM

चीनमधील चिंग शी ही महिलादेखील अशीच एक आहे. समुद्री लुटेऱ्यांवर राज्य करण्यासाठी या महिलेने अनाकलयीन डावपेच आखलेले आहेत. एवढंच नाही तर समुद्री लुटेऱ्यांची सत्ता आपल्याच हाती राहावी म्हणून या महिलेने आपल्याच दत्तक घेतलेल्या मुलाशी अनैतिक संबंध ठेवले.

सत्तेच्या लालसेपोटी दत्तक मुलाशीही अनैतिक संबंध, राणी चिंग शी नेमकी कोण आहे ?
CHING SHI
Follow us on

नवी दिल्ली : काही ऐतिहासिक घटना मोठ्या रसहस्यमयी असतात. काही घटनेमागचा इतिहास समजल्यानंतर तर आपण थक्क होऊन जातो. भूतकाळात अशा काही महिला होऊन गेलेल्या आहेत की त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यात आलेले आहे. तर इतिहासातील काही महिला त्यांच्या क्रुरतेमुळे ओळखल्या जातात. चीनमधील चिंग शी ही महिलादेखील अशीच एक आहे. समुद्री लुटेऱ्यांवर राज्य करण्यासाठी या महिलेने अनाकलनीय डावपेच आखलेले आहेत. एवढंच नाही तर समुद्री लुटेऱ्यांची सत्ता आपल्याच हाती राहावी म्हणून या महिलेने दत्तक घेतलेल्या मुलाशी अनैतिक संबंधही ठेवले.

वयाच्या सहाव्या वर्षापासू वेश्या व्यवसाय 

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला अठराव्या शतकालीत असून ती मूळची चीन देशातील आहे. तिचा जन्म 1775 मध्ये शिनहुईच्या ग्वांगडोंग येथे झाला. चिंग शी ही वयाच्या 6 सहाव्या वर्षापासून वेश्या म्हणून काम करत होती. अठराव्या शतकात बंदरावर आलेल्या जहाजांवर वैश्याव्यवसाय करणे ही एक सामान्य गोष्ट होती. समुद्री व्यापाऱ्यांशी शरीरसंबध ठेवल्यामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. समुद्री लुटेऱ्यांमध्ये तिची चर्चा रंगायची.

1801मध्ये लग्न केलं

याच काळात तिची भेट झेंग यी या समुद्री लुटेऱ्याशी झाली. या पहिल्या भेटीतच झेंग यी तिच्या प्रेमात पडला. नंतर 1801मध्ये दोघांनीही लग्न केलं. मात्र लग्न करताना चिंग शीने झेंग यी समोर एक अट ठेवली. लुटीमध्ये जिंकलेल्या प्रत्येक गोष्टीवर तिचाही अर्धा हक्क असेल, असं ती म्हणाली. ही अट मान्य केल्यानंतर दोघांचही लग्न झालं. या लग्नानंतर लगेच चिंग सीने मच्छीमाराच्या एका मुलाला दत्तक घेतलं. त्याच नाव झेंग बाओ साइ असं ठेवण्यात आलं.

दत्तक घेतलेल्या मुलाशीच अनैतिक संंबंध

पुढे 1807 मध्ये वयाच्या 42 व्या वर्षी झेंग यीचं निधन झालं. त्यानंतर समुदी लुटेऱ्यांची सत्ता थेट झेंग बाओ साइच्या हातात आली. मात्र लुटेऱ्यांची सत्ता आपल्याच हातात असावी असं चिंग शीला सतत वाटायचं. पण महिलेला समुद्री लुटेऱ्यांचा नेता होत येत नसल्यामुळे तिच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला. त्यानंतर चिंग शीने झेंग बाओवर आपल्या सौंदर्याची जादू करणं सुरु केलं. पुढे आपल्याच दत्तक मुलाशी तिने अनैतिक संबंध ठेवले. यानंतर तिने झेंग बाओशी लग्न केले. पुढे या दोघांना झांग युलिन नावाचा मुलगा आणि एक मुलगी झाली. 1822 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी झांग बाओचे निधन झाले.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना द्यायची कठोर शिक्षा

चिंग शी विषयी बीबीसी हिंदीने सविस्तर माहिती दिलेली आहे. चिंग शीला जगात समुद्री लुटेऱ्यांमध्ये सर्वात कठोर शिक्षा देणारी महिला म्हणून ओळखलं जायचं. एखाद्या लुटेऱ्याने किनाऱ्यावरच्या महिलेशी गैरवर्तन केलं तर ती त्याला कठोर शिक्षा द्यायची. त्यांचे कान कापायची. तसेच अन्य लुटेऱ्यांसमोर ती त्याला नग्न करुन फिरवायची. नंतर चिंग शीचा वयाच्या 69 व्या वर्षी मृत्यू झाला.

इतर बातम्या :

विजेचे संकट लवकरच संपेल का?, पूर्व भागातील वीजनिर्मिती 8 टक्क्यांनी वाढली

जास्तीत जास्त 4 महिने तर कमीत कमी 24 तासांचं आयुष्य, पृथ्वीवर सर्वात कमी काळ जगणाऱ्या सजीवांची माहिती

Bad Bank च्या मंडळात लवकरच अधिक संचालकांचा समावेश, खासगी बँकांमध्ये 49 टक्के हिस्सा

(china women ching xi became queen of pirates from sex workers know details)