Photo | हॉटेल सोडताना रुममधून घेऊन जाऊ शकता 9 वस्तू, चोरी समजली जाणार नाही !

अनेक हॉटेल्समध्ये तुम्हाला टूथपेस्टची टूथब्रश आणि टंग क्लीनर दिले जाते. काही हॉटेल्स आणि रेसॉर्ट्स तर ब्रश आणि टूथब्रशवर त्यांचं नावसुद्धा देतात. या माध्यमातून त्या हॉटेलची जाहिरात होते. आपण हॉटेल सोडल्यानंतर या सर्व गोष्टी फेकून दिल्या जातात. त्यामुळे चेकआऊट करताना या सर्व गोष्टी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता

1/6
मुंबई :  एखाद्या शहरात कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी जायचं असेल तर हॉटेलवर थांबणे हा उत्तम पर्याय असतो. हॉटेलमध्ये आपण दिलेल्या पैशांनुसार सेवा पुरवण्यात येते. महागड्या हॉटेल्समध्ये राहण्याची सुविधादेखील उत्तम असते. पण तुम्हाला माहिती आहे का की हॉटेल सोडताना तुम्ही काही वस्तू घरी घेऊन जाऊ शकता. या वस्तू सोबत घेतल्या तरी त्याला चोरी समजले जात नाही.

2/6
ब्रश, टूथपेस्ट: अनेक हॉटेल्समध्ये तुम्हाला टूथपेस्ट,  टूथब्रश आणि टंग क्लीनर दिले जाते. काही हॉटेल्स आणि रेसॉर्ट्स तर ब्रश आणि टूथब्रशवर त्यांचं नावसुद्धा देतात. या माध्यमातून त्यांच्या हॉटेलची जाहिरात होते. आपण हॉटेल सोडल्यानंतर या सर्व गोष्टी फेकून दिल्या जातात. त्यामुळे चेकआऊट करताना त्या सोबत घेऊन जाऊ शकता.

3/6
साबण, शाम्पू, कंडिशनर : ब्रश आणि टूथपेस्टप्रमाणेच काही हॉटेल्सकडून छोटा साबण, शॅम्पूची छोटी बॉटल आणि कंडिशनर पुरवले जाते. या गोष्टींनाही सोबत घेऊन जाता येते.

4/6
चहा, कॉफी बॅग्स : काही हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये चहा आणि कॉफीसाठी एक कीट पुरवली जाते. काही हॉटेल्मध्ये एक इलेक्ट्रिक जग ठेवला जातो. त्यासोबत एका बॉक्समध्ये चहा आणि कॉफीच्या छोट्या पिशव्या दिल्या जातात. सोबतच दूध पावडरच्या पिशव्या आणि साखरदेखील ठेवलेली असते. या गोष्टीसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जाता येतात.

5/6
शेव्हिंग कीट : महागड्या हॉटेल्समध्ये शेव्हिंग कीट देखील दिले जातात. यामध्ये ब्लेड असलेले रेझर, शेव्हिंग क्रीम अशा गोष्टी असतात. तुम्ही दिलेल्या भाड्यामध्ये या गोष्टींचा आधीच समावेश केलेला असतो. आधीच पैसे दिल्यामुळे तुम्ही या गोष्टी सोबत घेऊन जाऊ शकता.

6/6
वृत्तपत्र, शू शाईन कीट: अनेक हॉटेल्समध्ये वर्तमानपत्रदेखील दिले जाते. चेकआऊट करताना हे वर्तमानपत्र सोबत घेऊन जाता येते. त्याचप्रमाणे, काही हॉटेल्समध्ये कॉम्प्लिमेंटरी शू शाईन कीट दिली जाते. या सर्व गोष्टी हॉटेलमधून बाहेर पडताना सोबत घेऊन जाता येतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI