AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जास्तीत जास्त 4 महिने तर कमीत कमी 24 तासांचं आयुष्य, पृथ्वीवर सर्वात कमी काळ जगणाऱ्या सजीवांची माहिती

पृथ्वीवर खूप मोठी सजीवसृष्टी आहे. पण प्रत्येक जीवाचं आयुष्य हे आपल्यासारखं 60 ते 70 वर्षांपेक्षा जास्त काळ नसतं. प्रत्येक प्राणी-पक्ष्याचा जगण्याचा कालावधी हा मर्यादित आहे.

जास्तीत जास्त 4 महिने तर कमीत कमी 24 तासांचं आयुष्य, पृथ्वीवर सर्वात कमी काळ जगणाऱ्या सजीवांची माहिती
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 7:33 PM
Share

निसर्ग खूप ताकदवान आहे, असं आपण म्हणतो. सर्व सजीवांचं आयुष्य सुरळीत चालावं यासाठी निसर्गाने परिसंस्थेची निर्मिती केली. परिसंस्थेत सर्व प्रकारचे प्राणी, पशू, आणि सूक्ष्मजीवांचा समावेश होता. परिसंस्था चालणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. यातील सजीवांचा आयुष्याचा काळ हा विशिष्ट असा असतो. प्रत्येक सजीवाचं आयुष्य हे निसर्गाने आखून दिलेल्या चौकटींपुरता मर्यादित असतं. पण ते तितकं असण्यामागेदेखील काही महत्त्वपूर्ण कारण आहे. त्याचा जर अभ्यास केला तर या गोष्टी आपल्याला आणखी खोलात कळतील. पण आज आम्ही तुम्हाला सर्वात कमी आयुष्य जगणाऱ्या काही सजीवांची माहिती देणार आहोत.

पृथ्वीवर खूप मोठी सजीवसृष्टी आहे. पण प्रत्येक जीवाचं आयुष्य हे आपल्यासारखं 60 ते 70 वर्षांपेक्षा जास्त काळ नसतं. प्रत्येक प्राणी-पक्ष्याचा जगण्याचा कालावधी हा मर्यादित आहे. व्हेल, शार्क, कासव यांसारख्या जीवांचा जीवनकाळ हा बराच मोठा असतो. पण काही जीवांचं आयुष्य अवघ्या एक महिन्याभराचं असतं. अशाच काही जीवांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

ससा

जगाच्या प्रत्येक भागात जंगलात आढळत असलेला निष्पाप प्राणी म्हणजे ससा. लोक ससा घरांमध्येही पाळतात. ससा प्राणी आकर्षित करतो. त्याचं तुरुतुरु पळणं आपल्याला जास्त आकर्षित करतं. त्यामुळे अनेकजण घरात ससा पाळतात. पण त्यांचं आयुष्य फक्त 8 ते 12 वर्ष इतकं असतं. त्यांच्या अनेक प्रजाती आहेत. अनेक रंगांमध्ये आढळलेल्या सशाच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे मादी सशांमध्ये जास्त चरबी जमा होणे किंवा गर्भाशयाचा कर्करोग होणे.

गिनी पिग

लहान दिसणारा हा प्राणी दक्षिण अमेरिकेत आढळतो. हा प्राणी फक्त 4 ते 8 वर्षे जगतो, ज्याचा कालावधी उर्वरित प्राण्यांपेक्षा खूप कमी आहे. प्रौढ किंवा वयस्कर गिनी पिगचे वजन फक्त 700 ते 1200 ग्रॅम असते.

उंदिर

अनेक घरांमध्ये आपण उंदिर बघतो. उंदिर अनेक सूक्ष्मकीटक खातात. पण उंदिर जर घरात राहिला तर अनेकदा आपल्या घरातील बऱ्याच गोष्टींचं नुकसान करतो. उंदिरं घरात पुस्तकं, कागदपत्रे फाडण्या सारख्या खोड्या हमखास करतात. या उंदिरांच्या आयुष्याचा कालावधी देखील फार कमी असतो. उंदिर जास्तीत जास्त एक वर्ष जगतात.

ड्रॅगन फ्लाय

अनेकदा तुम्ही संध्याकाळी चार पंख असलेला ड्रॅगन फ्लाय उडताना पाहिला असेल. खरंतर हा एक माश्यांचा प्रकार आहे. या माश्यांचे अनेक रंग असतात. या माश्यांच्या वयाचा विचार केला तर त्या जास्तीत जास्त 4 महिने जगतात. अनेक ड्रॅगन माश्या 4 महिन्यांपेक्षा कमी काळ जगतात.

माश्या

आपण माश्यांना नेहमी बघतो. या माश्या घाणीच्या ठिकाणी किंवा अन्नपदार्थांवर बसताना आपण अनेकदा बघितलं असेल. माश्यांचं आयुष्य अवघ्या चार आठवड्यांचं असतं.

मच्छर

मच्छर किंवा डासचं आयुष्य सर्वात कमी असतं. त्यांचं आयुष्य फक्त 24 तासांचं असतं. त्यामुळे मच्छरला एक दिवसाचा कीटक म्हणूनही ओळखलं जातं.

हेही वाचा :

बिहारमध्ये भर दिवसा महिला मॉडेलवर गोळीबार, मोना रायची प्राणज्योत मालवली, हत्येमागील रहस्य रहस्यच राहिल?

इचलकरंजीत हॉटेल व्यावसायिकाची तलवारीने हत्या, संतप्त जमावाकडून संशयित आरोपींच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ, मोठा गदारोळ

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....