Baramati : रात्री बारामतीच्या स्टॅन्डवर ती रडतं होती, त्यानं तिला समजावून हॉटेलवर नेलं, अन् पुढं …

| Updated on: Feb 02, 2023 | 1:36 PM

परंतु ती अत्यंत दुखावलेल्या अवस्थेत होती. इयत्ता बारावीत शिकत असणारी मुलगी आई-वडिलांशी वाद झाला, म्हणून दोन दिवसापासून घरं सोडून निघून आली होती.

Baramati : रात्री बारामतीच्या स्टॅन्डवर ती रडतं होती, त्यानं तिला समजावून हॉटेलवर नेलं, अन् पुढं ...
बारामती एसटी स्टॅंड
Image Credit source: facebook
Follow us on

बारामती – काल रात्री साधारण साडेनऊ वाजता मी कामानिमित्त लोणीभापकर परिसरात (Lonibhapkar Area) असताना एक अनोळखी नंबर वरून फोन आला. तिकडून आवाज आला. ‘सर मी विजय कांबळे बोलतोय, अर्जंट कामं होतं तुम्ही कुठे आहात’. मी सांगितले मी बाहेर आहे काय कामं आहे सांगा. ‘त्यानं सांगितले सर एक सतरा वर्षाची मुलगी (Young girl) आहे’. बारामतीच्या स्टॅन्ड (Baramati stand) वर रडतं होती, ती म्हणतेय मी घरं सोडून निघून आलीय. मला पुण्याला जायचंय माझ्याकडे पैसे नाहीत. ती कोणत्यापन वाहनाला हात करतेय. पण वाहन थांबत नसल्यामुळे ती रडतं आहे. मी तिला पैसे देतो असं म्हणून विश्वासात घेऊन गार्गी हॉटेल मध्ये घेऊन आलोय पण पुढं काय करावं मला समजेना. मी विजयला सांगितले फक्त दहा मिनिटे तिला थांबवून ठेव मी पोलिसांना कळवतो.

मी लागलीच डीवायएसपी इंगळे साहेब, पी. आय. महाडिक साहेब यांना कळविले. दोन्ही अधिकाऱ्यांनी तात्काळ कोणताही विलंब न करता, आपल्याकडील कर्मचारी पाठवले. हॉटेल गार्गीमध्ये त्या मुलीशी पोलिसांनी चर्चा केली. परंतु ती अत्यंत दुखावलेल्या अवस्थेत होती. इयत्ता बारावीत शिकत असणारी मुलगी आई-वडिलांशी वाद झाला, म्हणून दोन दिवसापासून घरं सोडून निघून आली होती. काही वेळात मी ही तिथं पोहचलो महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन ताब्यात घेतलं.

दरम्यान तिथं असलेल्या विजय कांबळेशी संवाद केला. त्यानं केलेल कामं अत्यंत महत्वाचं होतं कारणं एका असाह्य मुलगी विश्वासात आली होती. ती सुंदर देखणी होती. ती त्याच्याबरोबर हॉटेल पर्यंत गेली होती. तो तिला फसवून कुठं ही घेऊन जाऊ शकला असता. तिच्याशी गैरकृत्य करू शकला असता. परंतु गरीब कुटुंबातील असला तरी आई वडिलांचे संस्कार आणि महापुरुषांची शिकवण त्याच्या बोलण्यात वागण्यात दिसून येत होती. एका मुलीची इज्जत आणि जीव वाचविणाऱ्या विजय कांबळे याचा आम्ही सत्कार नक्कीच करणार आहोत. पण या निमित्ताने मला एक प्रश्न निर्माण झाला. विजयने काही मिनिटात तिचा विश्वास जिंकला असेल तर हेच काम तिच्या आई वडिलांना का नाही जमले. विजय कांबळे तुझ्या कार्यास मनापासून सलाम.

हे सुद्धा वाचा

ही पोस्ट सोशल मीडियावरच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाली आहे.