दंगलीत खटला दाखल झाल्यानंतर काय होतं ? दंगलींचे खटले अनेक वर्ष का चालतात ?

| Updated on: Jun 13, 2023 | 4:36 PM

दंगल होऊन जाते, ताकदीने तरूणाई आक्रोशही सुध्दा दर्शवते. पुढे आयुष्यभर दंगलीत सहभागी झाल्याचा पश्चाताप करत बसते. कारण दंगलीत फेकलेला एक दगड आयुष्यात किती अडचणीचा ठरतो, हे वेळ निघून गेल्यावर कळतं.

दंगलीत खटला दाखल झाल्यानंतर काय होतं ? दंगलींचे खटले अनेक वर्ष का चालतात ?
maharashtra police
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

आरती औटी, मुंबई : सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक ठिकाणी दोन गटात गोंधळ सुरु असल्याचे पाहायला मिळतं आहे. काही तरुणींनी औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. कोल्हापूरात (latest kolhapur news) मागच्या आठवड्यात याचं कारणामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तिथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूरच्या पोलिसांनी तिथं इंटरनेट बंद ठेवलं. परिस्थिती मावळल्यानंतर पुन्हा सुरु केलं. कोल्हापूर सिटीमध्ये पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवला असून संशयित तरुणांना ताब्यात घेण्याचं काम सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ज्या तरुणांनी सोशल मीडियावर वाद होईल अशा पोस्ट ठेवल्या आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जे तरुण उसळलेल्या दंगलीत सामील झाले होते, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या पोलिस करीत आहेत. त्याचबरोबर अफवांवर विश्वास ठेऊ नका, तसेच शांतता राखा असं आवाहन महाराष्ट्रातील (maharashtra police) पोलिसांनी केलं आहे.

दंगल होऊन जाते, ताकदीने तरूणाई आक्रोशही सुध्दा दर्शवते. पुढे आयुष्यभर दंगलीत सहभागी झाल्याचा पश्चाताप करत बसते. कारण दंगलीत फेकलेला एक दगड आयुष्यात किती अडचणीचा ठरतो, हे वेळ निघून गेल्यावर कळतं. व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दंगलीत काही वेळासाठी सहभागी झालेल्या तरूणाईचं आयुष्यभराचं काय नुकसान होतं. हे सहभागी झालेल्या व्यक्तीला माहित असतं. कारण दंगलीवेळी कायदा हाती घेणाऱ्या प्रत्येक तरुणाला थांबवण्यासाठी होणाऱ्या परिणामांची जाणीव असेलली बरी…

हे सुद्धा वाचा

सहभागी झाल्यानंतर कोणते गुन्हे, कलम लावली जातात

कलम 353 सरकारी कामात अडथळा
कलम 427 तोडफोड करणे
कलम 188 सरकारी आदेशाचं उल्लंघन
कलम 109 गुन्ह्यास उत्तेजन देणं
कलम 143 नुकसान घडवून आणणं

समजा, दंगलीत तुम्ही सहभागी नसला, पण जमावबंदीचं उल्लंघन करुन तुम्ही फक्त गर्दीत जरी शिरलात, तरी तुमच्यावर जमावबंदीचं कलम १४४ लागू होतं. त्याचबरोबर सोशल मीडियावर तु्म्ही आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्यास कलम 153 लागू होतं

तरुणांचं नुकसान काय होतं

खासगी नोकरी लागल्यानंतर संबंधित कंपनीनं एनओसी मागितली, तर पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही. जर कंपनीचं तसं धोरण असल्यास तुम्हाला नोकरीवरती पाणी सोडावं लागतं. शिक्षण किंवा व्यवसायानिमित्त परदेशात जाताना व्हिसा किंवा पासपोर्टवेळी असंख्य अडचणी येतात. त्याचबरोबर पोलीस भरती, सैन्य भरती किंवा इतर सरकारी नोकरीच्यावेळी तुम्हाला पोलिसांकडून एनओसी मिळत नाही.

दंगलींचे खटले किती वर्षे चालतात ?

आतापर्यंतचा दंगलींचा इतिहास तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, आजवर एकाही नेत्यावर अथवा, नेत्यांच्या मुलांवर दंगलीबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. 2009 ला मिरजेत जी दंगल झाली होती, ते खटले 2019 पर्यंत चालले. 2004 ला भांडारकर मंडळाच्या तोडफोडीचे खटले 2017 पर्यंत म्हणजे 13 वर्ष चालले. म्हणजे पंचविशीतल्या ज्या मुलांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ते वयाची 35 शी ओलांडल्यानंतर खटल्यांमधून मुक्त होतील.

तरूणाईचं सळसळतं रक्त समाजाच्या भल्यासाठी खर्ची झालं पाहिजे. परंतु सध्या तरुणाईचा दुरूपयोग होताना दिसतं आहे. हे थांबायला हवं. एक दंगल तुम्हाला तुमच्याच नजरेत आयुष्यभरासाठी आरोपी बनवते. तुमच्या परिवाराचं, तुमच्या चांगल्या आयुष्यतील करिअरची स्वप्न भंग करते. दंगलीत सहभागी होणारे गुन्हे, कलमं, यांचे वाईट परिणाम आम्ही तुमच्यासमोर मांडले आहेत. आता विचार तुम्ही करा ?