निस्वार्थ भक्ती आणि प्रेमाने देवालाही जिंकता येतं, वाचा एका खऱ्या भक्ताची अनोखी कहाणी

| Updated on: Apr 05, 2021 | 4:18 PM

का गावात खूप कंजूस सेठजी राहात होते. एक दिवशी त्यांनी दुकानावर त्यांच्या (Saint Selfless Devotion For God) मुलाला बसवलं आणि सांगितलं की विना पैसे कुणालाही काही देऊ नको, मी जाऊन आलो.

निस्वार्थ भक्ती आणि प्रेमाने देवालाही जिंकता येतं, वाचा एका खऱ्या भक्ताची अनोखी कहाणी
सांकेतिक फोटो
Follow us on

मुंबई : एका गावात खूप कंजूस सेठजी राहात होते. एक दिवशी त्यांनी दुकानावर त्यांच्या (Saint Selfless Devotion For God) मुलाला बसवलं आणि सांगितलं की विना पैसे कुणालाही काही देऊ नको, मी जाऊन आलो. तेवढ्यात अचानक एक संत आले तिथे आले, जे वेगवेगळ्या ठिकाणांहून एका वेळेची भोजन सामुग्री घेत असत. त्यांनी मुलाला म्हटलं की बेटा मला जरा मीठ दे. मुलाने संताला डब्बा उघडून एक चमचा मीठ दिलं (A Unique Story Of The Saint Real, Selfless Devotion And Love For God).

सेठजी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की, डब्बा उघडा पडला होता. सेठजींनी मुलाला विचारलं काय रे काय विकलंस?, मुलानं सांगितलं की, एक संत जे तालावाजवळ राहातात त्यांना एक चमचा मीठ दिलं. यावरुन सेठजी भडकले आणि म्हणाले अरे मूर्खा यामध्ये तर विषारी पदार्थ आहे.

आता सेठजी धावत धावत संताजवळ पोहोचले. तेव्हापर्यंत संत जेवण बनवून भगवानला नैवेद्य लावून जेवायला बसले होते. सेठजी लांबूनच म्हणाले, महाराज थांबा तुम्ही जे मीठ आणलं होतं ते मीठ नाही तर विषारी पदार्थ होता. कृपा करुन तुम्ही हे भोजन करु नका.

संत म्हणाले, आम्ही तर प्रसाद घेणारच, कारण मी देवाला नैवेद्य दाखवलं आहे. नैवेद्य दाखवून जेवण सोडू शकत नाही. जर नैवेद्य दाखवलं नसते, तर कदाचित जेवणंही सोडलं असते. असं म्हणून संताने प्रसाद समजून जेवण सुरु केलं.

हे पाहून सेठजी हैराण झाले. ते रात्रभर तिथेच बसून राहिले. सेठजींना राहून राहून ही चिंता सतावत होती की जर संताला काही झालं तर त्याची मोठी बदनामी होईल. रात्री जर तब्येत खराब झाली, तर कमीतकमी ते संताला वैद्यांकडे घेऊन जाऊ शकतील, म्हणून ते तिथेच थांबले.

विचार करता करता त्यांना झोप लागली. दुसऱ्या सकाळी रोजप्रमाणे संत लवकर उठले आणि नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले. सेठजी म्हणाले, महाराज तुमची तब्येत बरी आहे ना? यावर संत म्हणाले, देवाची कृपा आहे. यानंतर ते पूजेसाठी मंदिराकडे निघाले.

जसं संतांनी मंदिराचं द्वार उघडलं तेव्हा तिथे भगवानच्या श्री विग्रहाचे दोन भाग झाले होते आणि त्यांचं शरीर काळं पडलं होतं. हे पाहताच सेठजी सर्व समजून गेले. भक्ताच्या अतूट विश्वासाला पाहून भगवानाने जेवणातील विष नैवेद्य म्हणून स्वत: ग्रहण केलं आणि भक्ताला प्रसाद ग्रहण करु दिला. यानंतर सेठजींनी तात्काळ मुलाला दुकान सोपवलं आणि स्वत: संताच्या शरणात आले आणि देवाची भक्ती करु लागले.

A Unique Story Of The Saint Real, Selfless Devotion And Love For God

संबंधित बातम्या :

कृष्णाच्या यशोदा मातेला विष्णूचं खास वरदान, जाणून घ्या पौराणिक कथा

जेव्हा पांडव आणि महादेव यांच्यात युद्ध झालं, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?