या सवयी असलेली मुले भविष्यात बनतात यशस्वी लीडर, कोणत्या आहेत त्या सवयी?
प्रत्येक मुलगा अभ्यासामध्ये हुशार असून चालत नाही, मुलांमध्ये जर हे गुण दिसत असतील तो मुलगा पुढे करतो मोठे नेतृत्व. चाणक्य यांनी केलेला काही वर्षांपूर्वी दावा.

प्रत्येक मूल अभ्यासातच हुशार असेल असे नाही. काही मुलांमध्ये लहान वयातच असे गुण दिसू लागतात, जे पुढे जाऊन त्यांना उत्तम नेतृत्व करणारी व्यक्ती बनवू शकतात. चाणक्यनीतीनुसार मुलांच्या स्वभावातील काही खास सवयी त्यांच्या भविष्यातील व्यक्तिमत्त्वाची दिशा ठरवतात.

ज्या मुलांना सतत नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, प्रश्न विचारायची सवय असते, त्यांच्यात शिकण्याची तीव्र इच्छा दिसून येते. चाणक्यांच्या मते जिज्ञासा आणि विचारशक्ती व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळे बनवतात.

तसेच काही मुले चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवतात. अन्याय सहन न करणे आणि धाडसाने मत मांडणे हे मजबूत नेतृत्वाचे लक्षण मानले जाते. दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती असलेली मुलेही लोकांचा विश्वास पटकन जिंकतात.

अपयश आल्यानंतर पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी हेही मोठे वैशिष्ट्य आहे. चाणक्यनीतीनुसार संयम आणि सातत्य यामुळेच व्यक्ती अधिक सक्षम बनते. याशिवाय स्वतःची वेगळी विचारसरणी ठेवणारी आणि इतरांची न वागणारी मुले आत्मविश्वासू असतात.

तज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलांच्या अशा सवयी ओळखून योग्य मार्गदर्शन दिल्यास ती मुले भविष्यात कुटुंब, समाज आणि देशाचे प्रभावी नेतृत्व करू शकतात. डिस्क्लेमर : ही माहिती सामाजिक आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित असून, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.