मृत्यू जवळ आल्यावर प्रत्येक व्यक्तीला हे 5 संकेत नक्कीच मिळतात, गरुड पुराण काय म्हणतं?

मृत्यूपूर्वी प्रत्येक व्यक्तीला काही विशिष्ट संकेत मिळतात. अगदी घरापासूनच त्या व्यक्तीला संकेत मिळण्यास सुरुवात होते. या सर्वांबद्दलची माहिती गरुड पुराणात दिली आहे. गरुड पुराणानुसार त्या व्यक्तीला प्रमुख ५ संकेत तर नक्कीच मिळतात. ते कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

मृत्यू जवळ आल्यावर प्रत्येक व्यक्तीला हे 5 संकेत नक्कीच मिळतात, गरुड पुराण काय म्हणतं?
According to Garuda Purana, every person receives 5 signs before death
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2025 | 1:35 PM

असं म्हणतात की मृत्यूपूर्वी माणसाला काही संकेत नक्कीच मिळतात. काही अनुभव नक्कीच येतात. याबद्दल सांगितलं आहे गरुड पुराणात. गरुड पुराणात पाप-पुण्य, तसेच स्वर्ग,नरक अशा अनेक गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे मृत्यू. गरुड पुराणात मृत्यूबद्दलही अनेक बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

हिंदू धर्मात अठरा महापुराण आहेत. गरुड पुराण हे त्यापैकी एक आहे. ज्यामध्ये 19000 श्लोक आहेत आणि ते दोन भागात ते विभागलेले आहे. भगवान विष्णू हे या पुराणाचे प्रमुख देवता आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार, गरुड पुराणाचे पठण केल्याने मृत व्यक्तीला मोक्ष मिळण्यास मदत होते आणि मृताच्या कुटुंबातील सदस्यांना आध्यात्मिक शांती मिळते. शिवाय, गरुड पुराणात मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीला कोणते लक्षण अनुभवता येतात याचे वर्णन केले आहे. या लेखात, मृत्यूपूर्वी काय संकेत मिळतात ते जाणून घेऊयात.

मरण्यापूर्वी व्यक्तीला मिळणारे 5 संकेत

मृत्यूपूर्वी अनेकांना अशुभ चिन्हे दिसतात

गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे अनेकांना मृत्यूपूर्वी चिन्हे दिसतात. जसं की, मृत्यूपूर्वी, एखाद्या व्यक्तीची सावली ही पाणी, तेल, तूप किंवा आरशात दिसत नाही. असे मानले जाते की अशा प्रतीकात्मक चिन्हे एखाद्या व्यक्तीच्या शेवटच्या क्षणांमध्ये आढळतात.

आजूबाजूला त्याच्या पूर्वजांचे आत्मे

मृत्यूपूर्वी, एखाद्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला त्याच्या पूर्वजांचे आत्मे जाणवू लागतात, त्या मृत अस व्यक्तीचा नातेवाईक त्यांच्याकडे परत येणार असल्याने, त्यांच्या मृत्यूनंतरच्या जीवनात आगमनाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात करतात.

कुत्रा तुमचा पाठलाग करू लागतो

जर तुमच्या घरातील कुत्रा तुमचा पाठलाग करू लागला आणि हे चार दिवसांपेक्षा जास्त काळ चालू राहिले तर समजून घ्या की तुमचा मृत्यू जवळ आला आहे.

आवाज येत नसेल तर

गरुड पुराणानुसार, जर दोन्ही कान बोटांच्या टोकांनी बंद केले आणि आवाज येत नसेल तर असे मानले जाते की त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे .

हातावरील रेषा नाहीशा होतात.

याशिवाय, गरुड पुराणात असेही नमूद आहे की मृत्यूच्या वेळी हातावरील रेषा नाहीशा होतात किंवा कधीकधी अदृश्य होतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)