वास्तूशास्त्रानुसार संध्याकाळी घराबाहेर ‘या’ गोष्टी दिल्याने घरात येते दारिद्र्य

वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील काही गोष्टी संध्याकाळी देण्यास मनाई असते. मान्यतेनुसार संध्याकाळी या गोष्टी दिल्याने लक्ष्मी माता नाराज होते. चला तर मग जाणून घेऊयात संध्याकाळी कोणत्या गोष्टी देऊ नयेत?

वास्तूशास्त्रानुसार संध्याकाळी घराबाहेर या गोष्टी दिल्याने घरात येते दारिद्र्य
vastu tips
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 06, 2025 | 11:53 PM

हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात आनंदी जीवनासाठी विशिष्ट नियम आहेत. हे नियम घर बांधण्यापासून ते त्यातील वस्तू आणि घरातील सजावटीच्या वस्तू ठेवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची योग्य दिशा असते. त्यानुसार वस्तू ठेवल्याने घरात सकारात्म ऊर्जा निर्माण होते. याशिवाय हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात सकाळ आणि संध्याकाळसाठी देखील विशिष्ट नियम आहेत. या नियमांनुसार सकाळ आणि संध्याकाळी आपण आपल्या घरातील काही वस्तु तसेच कामे टाळली पाहिजेत.

याव्यतिरिक्त काही वस्तू संध्याकाळी देण्यास देखील मनाई आहे. मान्यतेनुसार संध्याकाळी या वस्तू दिल्याने लक्ष्मी माता नाराज होते. तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात आपल्या घरातील कोणत्या वस्तू संध्याकाळी देऊ नयेत.

संध्याकाळी कोणालाही हळद देऊ नका

हळद हे शुभ समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर हळद इतरांना दिल्याने घरातील समृद्धी आणि शुभ ऊर्जा कमी होते. शिवाय असे केल्याने लक्ष्मी माता क्रोधित होऊ शकते, म्हणून यावेळी हळद किंवा हळदीशी संबंधित वस्तू बाहेर देणे टाळाव्यात.

या पांढऱ्या गोष्टी कोणालाही देऊ नका

दूध, दही, तांदूळ आणि साखर यासारख्या पांढऱ्या वस्तू शांत ऊर्जा आणि चंद्राशी संबंधित मानल्या जातात. सूर्यास्तानंतर या वस्तू कोणालाही देऊ नयेत. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर या वस्तू दिल्याने दुर्दैव येते आणि घरात आर्थिक समस्या निर्माण होतात.

संध्याकाळ झाल्यावर घरात झाडू मारू नये

वास्तुशास्त्रात झाडूचा संबंध धनाची देवी लक्ष्मी मातेशी आहे. संध्याकाळ झाल्यावर घर झाडल्याने धनहानी होते. असे मानले जाते की त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा देखील निघून जाते.

दही खाऊ नका

दही हे शीतल चंद्राशी संबंधित आहे आणि दही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. म्हणून संध्याकाळी दही देणे किंवा सेवन करणे शुभ मानले जात नाही.

भांडू नये

वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळनंतर घरात कधीही भांडण किंवा वादावादी करू नये. यामुळे लक्ष्मी देवी कोपते आणि घराभोवती दारिद्र्य येऊ लागते.

गरीब माणसाला मदत करा

जर एखादा गरीब माणूस संध्याकाळी तुमच्या दारात आला तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या क्षमतेनुसार अशा लोकांना काहीतरी द्या.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)