Chanakya Niti | या चार व्यक्तींशी चुकूनही वैर घेऊ नका, अन्यथा आयुष्य उद्ध्वस्त होईल…

| Updated on: Jun 12, 2021 | 7:28 AM

आपण अशा व्यक्तीशी वैमनस्य बाळगतो जो आपले जीवन पूर्णपणे उध्वस्त करु शकतो. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतिमध्ये अशा चार लोकांचा उल्लेख केला आहे ज्यांच्यासोबत शत्रूता बाळगण्यापूर्वी 10 वेळा विचार केला पाहिजे, अन्यथा आपले आयुष्य उध्वस्त होऊ शकते. ते चार व्यक्ती कोण जाणून घ्या | Acharya Chanakya

Chanakya Niti | या चार व्यक्तींशी चुकूनही वैर घेऊ नका, अन्यथा आयुष्य उद्ध्वस्त होईल...
तोंडावर गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध रहा! तुमचे संपूर्ण आयुष्य करू शकतात उध्वस्त
Follow us on

मुंबई : काही लोकांना खूप राग येतो. रागाच्या भरात लोक कोणाबरोबरही पंगा घेतात. वाद घालतात. परंतु कधीकधी हा राग आपल्यावर भारी पडतो आणि आपण अशा व्यक्तीशी वैमनस्य बाळगतो जो आपले जीवन पूर्णपणे उध्वस्त करु शकतो. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतिमध्ये अशा चार लोकांचा उल्लेख केला आहे ज्यांच्यासोबत शत्रूता बाळगण्यापूर्वी 10 वेळा विचार केला पाहिजे, अन्यथा आपले आयुष्य उध्वस्त होऊ शकते. ते चार व्यक्ती कोण जाणून घ्या  (Acharya Chanakya Said Do Not Have Enmity With These Four People In Chanakya Niti)-

आत्पद्वेषाद् भवेन्मृत्यु: परद्वेषाद् धनक्षय:
राजद्वेषाद् भवेन्नाशो ब्रह्मद्वेषाद कुलक्षय

1. या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य म्हणतात, राजाशी किंवा सरकारशी संबंधित लोकांशी वाद घालू नये. सरकारविरुद्ध उभे राहणे सोपे नाही. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होऊ शकते.

2. काही लोकांना स्वतःबद्दल खूप नकारात्मकता असते. असे लोक नेहमीच स्वतःला निकृष्ट मानतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, स्वत:ला कुठल्याही गोष्टीसाठी पात्र न समजणे हे देखील स्वत:शी द्वेष करण्यासारखेच आहे. लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती स्वत:चा खरा मित्र आणि सर्वात वाईट शत्रू देखील आहे. ज्याने स्वतःपासून आशा सोडली आहे त्याचे जीवन कोणीच वाचवू शकत नाही. अशी व्यक्ती दररोज शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते. तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. उणिवा दूर करा आणि चांगल्या गोष्टी वाढवा. स्वत: बद्दल सकारात्मक दृष्टीकोन जीवनात खूप महत्वाचा आहे.

3. जो तुमच्यापेक्षा सामर्थ्यवान आहे त्याच्याशी कधीही वाद घालू नका. जेव्हा अशा व्यक्तीशी सामना केला जातो, तेव्हा पैसाही वाया जातो आणि व्यक्तीचे आयुष्यही धोक्यात येते.

4. कोणत्याही विद्वान किंवा ब्राह्मणाचा अनादर करणे हे मोठे पाप आहे. असे करणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होते. म्हणून, चुकूनही कोणत्याही विद्वान किंवा ब्राह्मणचा अनादर करु नये.

Acharya Chanakya Said Do Not Have Enmity With These Four People In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून व्यक्ती कधीही समाधानी होत नाही, त्याचा लोभ वाढतच जातो

Chanakya Niti : कठीण काळातही हे 4 मित्र तुमच्या सोबत असतात, जाणून घ्या

Chanakya Niti | ज्या व्यक्तीमध्ये हे 5 गुण असतात, ते वाईट काळातही संयम ठेवतात