Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून व्यक्ती कधीही समाधानी होत नाही, त्याचा लोभ वाढतच जातो

| Updated on: Jun 10, 2021 | 12:06 PM

आचार्य यांच्या धोरणांमुळेच चंद्रगुप्त हा सामान्य मुलगा अखंड भारताचा चक्रवर्ती सम्राट बनला. आयुष्यभर आचार्य चाणक्य लोकांना मदत करत राहिले आणि त्यांना धर्माचा मार्ग दाखवत राहिले. त्यावेळी आचार्य यांनी असे पुस्तक लिहिले होते, ज्यामध्ये सुखी आयुष्याची सूत्रे सांगण्यात आली आहेत (Acharya Chanakya Said Human Will Be Never Satisfied From Money Food And Life In Chanakya Niti)

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून व्यक्ती कधीही समाधानी होत नाही, त्याचा लोभ वाढतच जातो
Acharya_Chanakya
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य यांची धोरणे शेकडो वर्षांपासून लोकांना मार्गदर्शन करत आहेत आणि आजही ते अगदी अचूक असल्याचे सिद्ध झाले आहेत. आचार्य यांच्या धोरणांमुळेच चंद्रगुप्त हा सामान्य मुलगा अखंड भारताचा चक्रवर्ती सम्राट बनला. आयुष्यभर आचार्य चाणक्य लोकांना मदत करत राहिले आणि त्यांना धर्माचा मार्ग दाखवत राहिले. त्यावेळी आचार्य यांनी असे पुस्तक लिहिले होते, ज्यामध्ये सुखी आयुष्याची सूत्रे सांगण्यात आली आहेत (Acharya Chanakya Said Human Will Be Never Satisfied From Money Food And Life In Chanakya Niti).

हे पुस्तक चाणक्य नीति म्हणून ओळखले जाते. चाणक्य नीतिमध्ये नमूद केलेल्या यशाच्या सूत्राचे पालन करून लोक आजही आपले आयुष्य आनंदी करू शकतात आणि जीवनातल्या चढ-उतारांवर सहज विजय मिळवू शकतात. आचार्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा तीन गोष्टी नमूद केल्या आहेत, ज्या पुरेशा असल्या तर व्यक्तीने त्यावर समाधान व्यक्त करावे. परंतु तरीही काहीजण समाधानी नसतात. ते नेहमी या गोष्टींकडे अधिक आकर्षित होतात. त्या गोष्टी काय आहेत ते जाणून घ्या –

पैसा –

पैसा ही अशी गोष्ट आहे जी एखाद्या व्यक्तीकडे कितीही असेल तरी त्याचे मन कधीही समाधानी राहात नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात अधिकाधिक पैसे मिळवण्याची इच्छा असते. हा लोभ कधीकधी त्याला चुकीच्या मार्गावरही नेतो आणि त्याला दलदलमध्ये प्रदेशात ढकलतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने पैशांच्या बाबतीत समाधानी राहायला शिकले पाहिजे.

आयुष्य –

प्रत्येकाला माहित आहे की एक दिवस मृत्यू निश्चित आहे, तरीही जगण्याची इच्छा संपत नाही. माणूस आसक्ती आणि भ्रमात इतका अडकतो की त्याचे शरीर जरी समर्थन देत नसले तरीसुद्धा त्याला अधिक आयुष्य जगण्याची इच्छा असते. प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवले पाहिजे की आयुष्य लहान असू शकते, परंतु असे असले पाहिजे की लोकांना ते अनेक वर्षांपर्यंत स्मरण केलं पाहिजे. म्हणून आयुष्य सार्थक करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जेवढंही जीवन मिळाले आहे ते आनंदाने जगा आणि जगात आनंद पसरवण्याचा प्रयत्न करा.

जेवण –

एखाद्या व्यक्तीला नेहमीच संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्याचे शरीर निरोगी राहील. अन्न ही आपल्या शरीराची गरज आहे, म्हणून ते खाणे आवश्यक आहे. परंतु काही लोक चव भ्रमात इतके अडकतात की अनेक पदार्थ खाल्ल्यानंतरही त्यांचे मन भरत नाही. त्यांना कायमच काहीतरी किंवा खाण्याची इच्छा असते.

Acharya Chanakya Said Human Will Be Never Satisfied From Money Food And Life In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : कठीण काळातही हे 4 मित्र तुमच्या सोबत असतात, जाणून घ्या

Chanakya Niti | ज्या व्यक्तीमध्ये हे 5 गुण असतात, ते वाईट काळातही संयम ठेवतात

Chanakya Niti: एखादा व्यक्ती लोकांचा आवडता लीडर कसा होतो? चाणक्य म्हणतात हे 4 गुण महत्वाचे!