Chanakya Niti | असे आई-वडील मुलांचे सर्वात मोठे शत्रू असतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात…

| Updated on: May 22, 2021 | 8:38 AM

महान मुत्सद्दी, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे सर्व विषयांचे अभ्यासक होते.

Chanakya Niti | असे आई-वडील मुलांचे सर्वात मोठे शत्रू असतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात...
Acharya-Chanakya
Follow us on

मुंबई : महान मुत्सद्दी, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे सर्व विषयांचे अभ्यासक होते. आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी चाणक्य नीति नावाच्या पुस्तकात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचं आजच्या जीवनातही आपण अनुसरण करु शकतो. कारण त्यांचे सांगितलेल्या गोष्टी सैद्धांतिक नाही तर व्यावहारिक आहेत (Acharya Chanakya Said Such Parents Are Like Enemies Not God For Children In Chanakya Niti).

जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या वचनांकडे पूर्ण लक्ष दिलं आणि त्या गोष्टी आयुष्यात स्वीकारल्या, तर तो सर्व संकटांपासून मुक्त होऊ शकतो आणि आपले जीवन सुलभ करु शकतो. या भागात आचार्य यांनी पालकांच्या संबंधातील एका श्लोकाद्वारे एका विशिष्ट परिस्थितीत मुलांचा शत्रू सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांचे धोरण काय म्हणतात ते जाणून घेऊ.

माता शत्रुः पिता वैरी येन बालो न पाठितः
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा

या श्लोकाद्वारे, आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की जे पालक आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात, ते त्यांच्या मुलांच्या शत्रूसारखे असतात. कारण निरक्षर मुलांना विद्वानांमध्ये कधीच आदर, मान-सन्मान मिळत नाही. हे मुलं विद्वानांमध्ये असे असतात जसे की हंसांच्या कळपात कावळा.

खरं तर या श्लोकाद्वारे आचार्य यांनी शिक्षणाची गरज आणि त्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला आहे. आजही आचार्य यांचे हे विधान अगदी बरोबर आहे. कारण, आयुष्यात फक्त शिक्षणच तुम्हाला अंधारातून प्रकाशात आणू शकते. शिक्षण एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्ही ठरवते. शिक्षणामुळे व्यक्तीची विचार करण्याची शक्ती वाढते आणि नवीन मार्ग खुले होतात.

सुशिक्षित व्यक्ती जिथेही जाईल तिथे त्याला सन्मान मिळतो. तो फक्त स्वत:साठीच नाही तर आपल्या संपूर्ण पिढीसाठी एक मार्ग खुला करतो. म्हणून प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना शिक्षित केले पाहिजे. यामुळेच मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या पालकांना आचार्य यांनी त्यांचा शत्रू म्हटले आहे.

Acharya Chanakya Said Such Parents Are Like Enemies Not God For Children In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : कोणाचीही पारख करताना या 4 गोष्टींकडे लक्ष द्या, कधीही होणार नाही धूळफेक

Chanakya Niti | या 6 सवयींमुळे घरात येते दारिद्र्य, देवी लक्ष्मी होते नाराज, आचार्य चाणक्य काय सांगतात पाहा…