AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : कोणाचीही पारख करताना या 4 गोष्टींकडे लक्ष द्या, कधीही होणार नाही धूळफेक

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या काळाशी तुलना केली असता आजचा काळ पूर्णपणे बदलला आहे. खाण्या-पिण्यापासून ते जीवन जगण्याच्या पद्धतीपर्यंत सर्वकाही पूर्णपणे बदललं आहे.

Chanakya Niti : कोणाचीही पारख करताना या 4 गोष्टींकडे लक्ष द्या, कधीही होणार नाही धूळफेक
Acharya_Chanakya
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 18, 2021 | 10:05 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या काळाशी तुलना केली असता आजचा काळ पूर्णपणे बदलला आहे. खाण्या-पिण्यापासून ते जीवन जगण्याच्या पद्धतीपर्यंत सर्वकाही पूर्णपणे बदललं आहे. पण तरीही आजच्या काळात आचार्य चाणक्य यांचे सल्ले अत्यंत अचूक ठरतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये त्यांचे शब्द आजही अचूक सिद्ध झाले आहेत (Acharya Chanakya Said If You Want To Test Anyone Keep These Things In Mind In Chanakya Niti).

आचार्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीची चाचणी करण्यासाठी त्यांचे 4 गुण पहा. आजचा काळ नक्कीच दिखावेगिरीचा आहे, पण आचार्य चाणक्य यांच्या सल्ल्यांकडे लक्ष देऊन जर तुम्ही एखाद्या व्यक्तीची परीक्षा घेतली तर तुमची फसवणूक होणार नाही. चाणक्य यांचे धोरण काय म्हणतात ते जाणून घ्या.

1. आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीबद्दल त्वरित कोणतेही मत तयार करु नये. प्रथम त्याचे गुणधर्म पाहिले पाहिजेत. अशा परिस्थितीत व्यक्तीची ओळख प्रथम त्याच्या वागण्यानुसार केली जाते, कारण माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. अशात तो इतर लोकांशी कसा वागतो ते पाहा. अशा प्रकारे आपण त्या व्यक्तीबद्दल बरेच काही सांगू शकाल.

2. दुसरी गोष्ट म्हणजे त्याग करण्याची भावना. व्यक्तीमध्ये त्यागाची भावना आहे की नाही हे पहाण्याचा प्रयत्न करा. ज्या लोकांमध्ये ही भावना असेल, ते इतरांचे दु:ख समजून घेणारे आणि मदत करणारे असतात.

3. व्यक्ती कोणत्या कामाशी संबंधित आहे यावरुनही तिच्या स्वभावाचा अंदाज घेतला जाऊ शकतो. जर ती व्यक्ती व्याजाचं काम करत असेल, तर त्याच्या स्वभावात नक्कीच हुशारी आहे असं समजा.

4. चौथी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचे गुण म्हणजेच त्याची वैयक्तिक वैशिष्ट्ये. एखाद्या व्यक्तीचे काही गुण जन्मावेळी त्याला भेटतात आणि काही तो त्याच्या संस्कार आणि घरच्या वातावरणापासून विकसित करतो. त्याचे गुण पाहून आपण एखादा व्यक्ती योग्य आणि अयोग्य आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

Acharya Chanakya Said If You Want To Test Anyone Keep These Things In Mind In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : आयुष्यात तुम्हाला यश मिळवायचंय?, चाणक्यांची ही निती तुम्ही नक्की वाचा…

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...