
ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष 2026 मध्ये तब्बल 12 वर्षांनंतर गुरू ग्रह आपली रास बदलणार आहे . या संक्रमणामुळे अत्यंत शुभ मानला जाणारा ‘हंस महापुरुष योग’ तयार होईल. 2 जून 2026 च्या रात्री गुरू ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल. यामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा काळ येणार आहे. हा राजयोग तीन राशींच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. तर त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. पंचमहापुरूष योगांपैकी हंस महापुरुष योग हा वैदिकशास्त्रानुसार गुरूने निर्माण केलेला एक उच्च राजयोग आहे, जो गुरू त्याच्या स्वतःच्या राशीत मध्यवर्ती स्थितीत असतो तेव्हा तयार होतो.
हंस महापुरुष योग निर्माण झाल्याने या तीन राशींच्या व्यक्तीला ज्ञान, संपत्ती, आदर आणि धार्मिक नम्रता मिळते. तर आजच्या लेखात आपण बारा राशींपैकी अशा कोणत्या तीन भाग्यवान राशी आहेत त्या जाणून घेऊयात.
कन्या रास
गुरुच्या हंस महापुरुष राजयोगामुळे कन्या राशीच्या लोकांना सकारात्मक उत्पन्नाचा लाभ मिळणार आहे. गुरु कन्या राशीतून अकराव्या घरात भ्रमण करत असल्याने या काळात या राशीच्या लोकांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकते. तसेच नवीन मार्गांनी पैसे कमवाल. शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरी संबंधित बाबींमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच प्रतिष्ठा वाढेल, कारकीर्द वाढेल. व्यावसायिकांना मोठे व्यवसायिक स्त्रोत निर्माण होऊ शकतात. तर कन्या राशीच्या लोकांना कुटुंबात संतानाशी संबंधित चांगली बातमी मिळेल.
तुला रास
गुरु-हंस महापुरुष राजयोगाच्या निर्मितीमुळे तूळ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. हा राजयोग तुमच्या संवाद कुंडलीच्या कर्मभावात तयार होईल, त्यामुळे या काळात तुमच्या कामात आणि कारकिर्दीत लक्षणीय प्रगती दिसून येईल. काम करणाऱ्यांना ऑफिसमध्ये त्यांच्या कामाचे कौतुक होणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. या काळात भविष्यातील योजना सुव्यवस्थित आणि मजबूत होताना दिसणार आहे. सामाजिक पाठिंबा देखील उपलब्ध असेल. या काळात व्यवसायिकांना लक्षणीय आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन उद्योजकांसाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे.
वृश्चिक रास
या राशीसाठी हंस महापुरुष राजयोग सकारात्मक परिणाम निर्माण होणार आहे. हा राजयोग वृश्चिक राशीच्या नवव्या घरात तयार होईल. यामुळे मंगळ ग्रहाची स्थिती खूप मजबूत असेल, म्हणून या काळात तुम्ही जे काही कराल ते यशस्वी होईल. तुम्ही काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता. हा काळ आध्यात्मिक आणि वैयक्तिक विकासासाठी अनुकूल असेल. या राशीच्या लोकांना सर्जनशील कार्य आणि कलात्मक कार्यात यश मिळेल. या काळात प्रवास किंवा नवीन नातेसंबंध नवीन संधी प्रदान करतील. वाढत्या सर्जनशीलतेमुळे या राशीच्या लोकं त्यांच्या जीवनात मोठे यश मिळवाल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)