Ashadha Amavasya 2022: आषाढ अमावास्येच्या दिवशी अवश्य करा ‘हे’ शुभ काम; आयुष्यात होईल भरभराट

| Updated on: Jun 16, 2022 | 10:19 AM

हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्याच्या अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा हलाहरी अमावस्या (Halhri amavasya 2022) म्हणतात. यावेळी आषाढ महिन्यातील अमावस्या 28 जून 2022 रोजी आहे. चांद्रमासानुसार आषाढ हा वर्षातील चौथा महिना आहे. यानंतर पावसाळा सुरू होतो. आषाढ महिन्यातील अमावस्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पवित्र नदी, तलावात स्नान करून पितरांसाठी दान व नैवेद्य देण्याचा […]

Ashadha Amavasya 2022: आषाढ अमावास्येच्या दिवशी अवश्य करा हे शुभ काम; आयुष्यात होईल भरभराट
Follow us on

हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्याच्या अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा हलाहरी अमावस्या (Halhri amavasya 2022) म्हणतात. यावेळी आषाढ महिन्यातील अमावस्या 28 जून 2022 रोजी आहे. चांद्रमासानुसार आषाढ हा वर्षातील चौथा महिना आहे. यानंतर पावसाळा सुरू होतो. आषाढ महिन्यातील अमावस्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पवित्र नदी, तलावात स्नान करून पितरांसाठी दान व नैवेद्य देण्याचा नियम आहे. याशिवाय या दिवशी पितरांसाठी व्रत करण्याची परंपरा आहे. यामुळे तुमच्यावर पितरांची कृपा राहते. पितृदोष (Pitrudosh) आणि काल सर्प दोष (Kalsarp Dosh) दूर करण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊन माणसाचे जीवन सुखी होते अशी मान्यता आहे. सुख समृद्धी मिळवण्यासाठी आषाढ अमावस्येच्या दिवशी काय करावे हे जाणून घेऊया.

आषाढ अमावस्या मुहूर्त

अमावस्या तिथीची सुरुवात: 28 जून, सकाळी 05:53 पासून
अमावस्या समाप्ती: 29 जून, सकाळी 08:23 वाजता

आषाढ अमावस्येला हे काम करा

धार्मिक शास्त्रांमध्ये पौर्णिमेसारखेच अमावास्येलाही स्नान-दानाला विशेष महत्त्व मानले जाते, त्यामुळे आषाढ अमावस्येला लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. अमावस्या तिथी ही पूर्वजांना समर्पित असते असे मानले जाते. या दिवशी स्नान केल्यानंतर त्यांची पूजा करावी. अशा स्थितीत स्नान केल्यानंतर पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण करावे. याशिवाय तुमच्या कुंडलीत पितृदोष असल्यास आषाढ अमावस्येला यज्ञ करावा. यामुळे पितृऋणातून मुक्तता मिळते.

हे सुद्धा वाचा

आषाढ अमावस्येला सूर्य, भगवान शिव, माता गौरी आणि तुळशीला 11 वेळा प्रदक्षिणा घालावी. याशिवाय आषाढ अमावस्येला कोणत्याही गरीब किंवा गरजूला दान-दक्षिणा द्या. शक्य असल्यास या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करा. अमावस्येला वृक्षारोपण करा. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात स्तोत्र आणि स्तुतीसह देवाचे आभार मानून करावी.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)