AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashadh Month Vrat 2022: आला व्रत वैकल्याचा महिना; आषाढ महिन्यातले सर्व सण आणि व्रत

हिंदू पंचांगानुसार, वर्षाचा चौथा महिना आषाढ (Ashadh Month Vrat 2022) सुरु आहे, 15 जून 2022, बुधवारपासून आषाढ महिना सुरू झाला आहे (Ashadh month started). कालपासून सुरू झालेला आषाढ महिना 13 जुलै 2022, बुधवारी संपेल. धार्मिक शास्त्रानुसार आषाढ महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. तसेच गुरुपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात गुरुपौर्णिमेसह (Gurupurnima 2022) अनेक मोठे […]

Ashadh Month Vrat 2022: आला व्रत वैकल्याचा महिना; आषाढ महिन्यातले सर्व सण आणि व्रत
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 16, 2022 | 9:34 AM
Share

हिंदू पंचांगानुसार, वर्षाचा चौथा महिना आषाढ (Ashadh Month Vrat 2022) सुरु आहे, 15 जून 2022, बुधवारपासून आषाढ महिना सुरू झाला आहे (Ashadh month started). कालपासून सुरू झालेला आषाढ महिना 13 जुलै 2022, बुधवारी संपेल. धार्मिक शास्त्रानुसार आषाढ महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. तसेच गुरुपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात गुरुपौर्णिमेसह (Gurupurnima 2022) अनेक मोठे धार्मिक सण येत आहेत (aashadh month fast). जाणून घेऊया.  आषाढ महिन्यात सूर्यदेवासह वरुण देवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात येणाऱ्या देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात. तेव्हापासून चातुर्मास सुरू होतो. या दरम्यान सर्व प्रकारचे शुभ कार्य थांबतात, कारण या चार महिन्यांत देवांची झोप लागते. जाणून घेऊया आषाढ महिन्यातील व्रत आणि सण.

  1. 15 जून, बुधवार, मिथुन संक्रांती- मिथुन संक्रांती आषाढ महिन्यातील प्रतिपदेला येत आहे. या दिवशी सूर्य देव एक महिन्यासाठी मिथुन राशीत प्रवेश करेल.
  2. 17 जून, शुक्रवार, कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी- ही तिथी गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते.
  3.  20 जून, सोमवार – कालाष्टमी व्रत, मासिक जन्माष्टमी.
  4. 24 जून, शुक्रवार, योगिनी एकादशी – या दिवशी श्री हरी विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे.
  5. 26 जून, रविवार, प्रदोष व्रत – या दिवशी व्रत केल्यास भगवान शंकराची कृपा होते.
  6. 27 जून, सोमवार, मासिक शिवरात्री – या दिवशी शिवाची पूजा करण्याचा नियम आहे.
  7. 29 जून, बुधवार, आषाढ अमावस्या – या दिवशी पितरांचे तर्पण केले जाते.
  8. 30 जून, गुरुवार- या दिवसापासून गुप्त नवरात्रीला सुरुवात होत आहे.
  9. 01 जुलै, शुक्रवार – या दिवसापासून जगन्नाथ रथयात्रा काढण्यात येणार आहे.
  10. ०3 जुलै, रविवार, विनायक चतुर्थी व्रत- या दिवशी गणेश भक्त उपवास करतात.
  11. 04 जुलै, सोमवार, स्कंद षष्ठी- या दिवशी भगवान कार्तिकेयची पूजा केली जाते.
  12. 09 जुलै, मंगळवार – गौरी व्रत
  13. 10 जुलै, रविवार – देवशयनी एकादशी, वासुदेव द्वादशी, चातुर्मास प्रारंभ
  14. 11 जुलै, सोमवार – सोम प्रदोष व्रत
  15. 12 जुलै, मंगळवार – जया पार्वती व्रत
  16. 13 जुलै, बुधवार – गुरु पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, व्यास पूजा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप