Ashadi Ekadashi Wishes in Marathi : आषाढी एकादशीनिमित्त पंढरी नटली, प्रियजनांना पाठवा हे खास शुभेच्छा संदेश

Ashadi Ekadashi Wishes in Marathi : आषाढी एकादशीला देवशयनी, पद्मनाभा किंवा मोठी एकादशी असेही म्हटले जाते. 25 जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या या एकादशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना खालील शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

Ashadi Ekadashi Wishes in Marathi : आषाढी एकादशीनिमित्त पंढरी नटली, प्रियजनांना पाठवा हे खास शुभेच्छा संदेश
Ashadi Ekadashi Wishes in Marathi
Image Credit source: Google
| Updated on: Jul 24, 2026 | 7:30 PM

आषाढी एकादशीनिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. विठुरायाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांना लागली आहे. कारण वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आहे. या एकादशीला देवशयनी, पद्मनाभा किंवा मोठी एकादशी असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, ही देवांची रात्र असते, या दिवसानंतर देव झोपी जातात आणि चातुर्मास सुरू होतो. या खास दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजाही संपन्न होणार आहे. 25 जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या या एकादशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना खालील शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला,

कंठ हा सोकला आळविता…

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

 

गुणा आला ईटेवरी, पीतांबरधारी सुंदर तो,

डोळे कानन त्याच्या ठायीं, मन पायीं राहो हें…

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

 

गुरू माता गुरू पिता, गुरू आमुची कुळदेवता,

थोर पडतां साकडे, गुरू रक्षी मागें पुढे…

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

 

जाऊ देवांचिया गावां,

देव देईल विसांवा…

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

 

ज्या सुखाकारणे देव वेडावला,

वैकुंठ सोडूनी संतसदनी राहिला…

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल आवडी प्रेमभावो,

विठ्ठल नामाचा रे टाहो…

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

 

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

पहाताच होती दंग आज सर्व संत

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

सावळे सुंदर रूप मनोहर

राहो निरंतर हृदयी माझे!

आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

 

सोहळा जमला आषाढी वारीचा

सण आला पंढरीचा

मेळा जमला भक्तगणांचा

ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

 

तुझा रे आधार मला

तूच रे पाठीराखा

तूच रे माझ्या पांडुरंगा

चुका माझ्या देवा

घे रे तुझ्या पोटी

तुझे नाम ओठी सदा राहो

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

सोहळा जमला आषाढी वारीचा

सण आला पंढरीचा,

मेळा जमला भक्तगणांचा,

ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

चला पंढरीसी जाऊ,

रखमादेवीवरा पाहू,

डोळे निवतील कान,

मना तेथेचि समाधान,

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us