चिमूटभर कापूर कोमट पाण्यात मिसळा आणि काय फायदे होतात ते पाहा, जाणून आजच सुरु कराल उपाय

वास्तूशास्त्रामध्ये कापूरला धार्मिक महत्त्व आहे. कापूरचे अनेक फायदे देखील आहेत. पूजेसाठी मुख्यतः कापूरचा वापर करण्यात येतो. पण कापूरच्या सुगंधामुळे सकारात्मक देखील वाटतं... तर चिमूटभर कापूर कोमट पाण्यात मिसळा आणि काय फायदे होतात ते पाहा, जे तुमच्यासाठी खरंच उपायकारक ठरतील...

चिमूटभर कापूर कोमट पाण्यात मिसळा आणि काय फायदे होतात ते पाहा, जाणून आजच सुरु कराल उपाय
| Updated on: Jul 01, 2026 | 8:35 PM

तुळस, फुले, फळे यांना हिंदू धर्मात जे महत्त्व आहे, तेच महत्त्वा लहान कापूरला देखली आहे. वास्तूशास्त्रामध्ये कापूरला धार्मिक महत्त्व आहे. अनेक जण संध्याकाळ झाली की, कापूरदानीमध्ये कापूर ठेवतात, ज्याचा सुगंध संपूर्ण घरात दरवळतो आणि सकारात्मक उर्जा निर्माण होते… पण अनेक कठीण समस्यांवर देखील कपूर परिणामकारक आहे. असंख्य लोक असे आहेत जे, घरातील आर्थिक समस्या , कौटुंबिक वाद किंवा सततच्या आरोग्य समस्यांनी त्रस्त असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, याचं मुख्य कारण घरात किंवा आपल्या सभोवताली असलेली नकारात्मक ऊर्जा. अशात कापूरापासून बनवलेला एक छोटा आणि सोपा उपाय या सर्व समस्यांवर आश्चर्यकारक काम करतो. दररोज सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडी कापराची पावडर किंवा कापराच्या तेलाचे दोन थेंब टाकून अंघोळ करण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घ्या….

ज्योतिषशास्त्रानुसार, कापूर हे शुक्र आणि चंद्र या ग्रहांचे प्रतीक मानले जाते. शुक्र आपल्या जीवनात संपत्ती, ऐश्वर्यपूर्ण जीवन आणि आनंद आणतो, तर चंद्र आपल्या मनःस्थितीवर नियंत्रण ठेवतो. असे मानले जाते की कापराच्या पाण्याने स्नान केल्याने कुंडलीतील या दोन ग्रहांचे दोष दूर होतात आणि शुभ परिणाम मिळतात.

कापराच्या पाण्याने नियमित स्नान केल्याने हळूहळू आर्थिक समस्या दूर होतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात आणि ज्यांना व्यवसायात व व्यवहारात तोटा होत आहे, त्यांना आर्थिक फायदा होतो.

कापराचा अनोखा सुगंध मनातील तीव्र ताण आणि चिंता दूर करतो. तो दिवसभर सक्रियपणे काम करण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. ज्यांना रात्री चांगली झोप लागत नाही किंवा वाईट स्वप्नांचा त्रास होतो, त्यांना हा उपाय घेतल्याने गाढ झोप लागू शकते.

आरोग्याच्या दृष्टीने, कापूरमध्ये जीवाणूनाशक आणि बुरशीनाशक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. कापूरयुक्त पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेवरील जीवाणू नष्ट होतात आणि खाज सुटणे व ॲलर्जी यांसारख्या त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो. हे त्वचेला संसर्गापासून वाचवते, विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात.

पण कापूरचा वापर करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. अंघोळीच्या पाण्यात कापूर वापरताना, तो अगदी कमी प्रमाणात वापरा. अतिवापरामुळे त्वचेला जळजळ होऊ शकते. ज्यांची त्वचा नाजूक आहे, त्यांनी याचा वापर करण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी असा सल्ला दिला जातो. हा उपाय केल्याने काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये आणि आर्थिक परिस्थितीत आश्चर्यकारक बदल दिसून येतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us