Astrology : दिड वर्षानंतर राहू केतू करणार राशी परिवर्तन, या चार राशींच्या लोकांचे नशिब उजळणार

राहू आणि केतू मागे सरकतात. सोप्या शब्दात, राहू आणि केतू उलट फिरतात. सध्या राहू मेष राशीत तर केतू तूळ राशीत बसला आहे. 30 ऑक्टोबर रोजी राहू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल.

Astrology : दिड वर्षानंतर राहू केतू करणार राशी परिवर्तन, या चार राशींच्या लोकांचे नशिब उजळणार
राहू केतू
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 21, 2023 | 10:28 PM

मुंबई : हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला (Astrology) विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्र ग्रहांच्या राशी बदलांचा मानसाच्या जीवनावर परिणाम पडतो. ज्योतिषांच्या मते, 2023 च्या शेवटी राहू-केतू (Rahu Ketu) राशी बदलतील. राहू आणि केतू मागे सरकतात. सोप्या शब्दात, राहू आणि केतू उलट फिरतात. सध्या राहू मेष राशीत तर केतू तूळ राशीत बसला आहे. 30 ऑक्टोबर रोजी राहू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. तर केतू तूळ राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल. राहू-केतूच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. यापैकी 4 राशींना राहू-केतूच्या राशी परिवर्तनाचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया या कोणत्आ राशी आहेत.

या चार राशींच्या लोकांच्या जीवनात होणार बदल

वृषभ

ज्योतिषांच्या मते वृषभ राशीला राहू-केतू या अशुभ ग्रहांच्या संक्रमणाने लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या सर्व कामात यश मिळेल. आर्थिक स्थितीही मजबूत राहील. भागीदारीत काम करत असाल तर व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. एकंदरीत धनाच्या दृष्टीने काळ शुभ राहणार आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी राहू-केतूचे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. यामुळे सिंह राशीच्या लोकांचे नशीब बदलेल. रखडलेले पैसे मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यामुळे सर्व वाईट गोष्टी घडू लागतील. नोकरी करणाऱ्या लोकांना उच्च पद मिळू शकते.

धनु

धनु राशीच्या लोकांना साडे सतीपासून मुक्ती मिळाली आहे. यानंतर धनु राशीलाही गुरूच्या मेष राशीत होणार्‍या संक्रमणाचा लाभ झाला आहे. दुसरीकडे राहू-केतूच्या राशी बदलामुळे धनु राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांनाही फायदा होईल. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. रखडलेली कामेही पूर्ण होतील. अविवाहित लोकांचे विवाह होण्याची शक्यता आहे. एकंदरीत धनु राशीच्या लोकांसाठी काळ अतिशय अनुकूल असणार आहे.

मकर

केतूच्या राशी बदलामुळे मकर राशीच्या लोकांना धनलाभ होईल. या काळात मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनाही उच्च पद मिळू शकते. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाऊ शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)