August 2021 Festivals List : ऑगस्ट महिन्यात अनेक महत्त्वाचे सण, जाणून घ्या संपूर्ण यादी

जर आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार पाहिले तर जुलै महिना जवळजवळ संपला आहे आणि ऑगस्ट महिना सुरु होणार आहे. उपवास आणि उत्सवांच्या दृष्टिकोनातून ऑगस्ट महिना खूप महत्वाचा ठरणार आहे.

August 2021 Festivals List : ऑगस्ट महिन्यात अनेक महत्त्वाचे सण, जाणून घ्या संपूर्ण यादी
ऑगस्ट महिन्यात साजरे होतील अनेक मोठे सण, जाणून घ्या तुमचे आवडते सण कधी येणार
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jul 28, 2021 | 1:42 PM

मुंबई : हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण महिना हा वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. यावर्षी हा पवित्र श्रावण महिना 09 ऑगस्ट 2021 पासून सुरु होईल आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल (August Month 2021 All Important Festivals And Vrat List).

दुसरीकडे, जर आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार पाहिले तर जुलै महिना जवळजवळ संपला आहे आणि ऑगस्ट महिना सुरु होणार आहे. उपवास आणि उत्सवांच्या दृष्टिकोनातून ऑगस्ट महिना खूप महत्वाचा ठरणार आहे.

1 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान कामिका एकादशी ते हरतालिका आणि रक्षाबंधन असे मोठे उत्सव असतील. यानंतर जन्माष्टमीचा सण ऑगस्टच्या शेवटी साजरा केला जाईल. म्हणजेच ऑगस्टचा संपूर्ण महिना व्रत आणि सण साजरे करण्यात जाईल. ऑगस्ट महिन्यात येणार्‍या सर्व उपवास आणि उत्सवांची यादी जाणून घ्या.

ऑगस्ट महिन्यातील व्रत आणि सण

💠 04 ऑगस्ट 2021 : कामिका एकादशी

✳️ 05 ऑगस्ट 2021 : प्रदोष व्रत

💠 06 ऑगस्ट 2021 : मासिक शिवरात्रि

✳️ 08 ऑगस्ट 2021 : श्रावण अमावस्या

💠 11 ऑगस्ट 2021 : हरतालिका

✳️ 12 ऑगस्ट 2021 : विनायक चतुर्थी

💠 13 ऑगस्ट 2021 : नाग पंचमी

✳️ 16 ऑगस्ट 2021 : पारसी नवीन वर्ष

💠 18 ऑगस्ट 2021 : श्रावण पुत्रदा एकादशी

✳️ 19 ऑगस्ट 2021 : मुहर्रम

💠 20 ऑगस्ट 2021 : प्रदोष व्रत

✳️ 21 ऑगस्ट 2021 : ओणम

💠 22 ऑगस्ट 2021 : रक्षाबंधन, श्रावण पौर्णिमा

✳️ 25 ऑगस्ट 2021 : संकष्टी चतुर्थी

💠 30 ऑगस्ट 2021 : जन्माष्टमी

August Month 2021 All Important Festivals And Vrat List

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Sawan 2021 : शंकराला बेलपत्र अर्पण करताना या गोष्टी ठेवा लक्षात, अडकलेली कामे मार्गी लागतील

पूजा करताना तुमच्या हातून ‘या’ चुका घडत नाहीत ना? जाणून घ्या काय घ्यायची खबरदारी

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें