
वास्तुशास्त्रानुसार घराबाबत अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात ज्यांच्या मदतीने आपण बरेच वास्तूदोष दूर करू शकतो. त्याचपद्धतीने फेंगशुईनुसार देखील घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात याबद्दल देखील सांगण्यात आलं आहे. बेडरूममध्ये फेंगशुईनुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते त्यासाठी काय उपाय करावे आणि कोणत्या वस्तू बेडरुममध्ये ठेवणे टाळावे जेणेकरून अडचणी येणार नाहीत हे जाणून घेऊयात.
बेडरूममध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत?
फेंगशुईनुसार, बेडरूममध्ये काही वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि कुटुंबाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कारण बेडरूम ही अशी जागा आहे जिथे दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आपण आराम करतो. शांत झोप घेतो. बेडरूममध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत ते जाणून घेऊया.
लॅपटॉप
फेंगशुईनुसार, कधीही बेडरूममध्ये लॅपटॉप ठेवू नयेत. बेडरूमच्या भिंतींवर गडद रंग असू नये अन्यथा ताण आणि राग वाढवू शकतात. याचा झोपेवरही परिणाम होऊ शकतो.
बेडखाली या गोष्टी ठेवू नका
फेंगशुईनुसार, पलंगाखाली वस्तू ठेवल्याने जीवनात अडथळे आणि समस्या वाढतात. शिवाय, पलंग अशा प्रकारे ठेवू नका की तो मुख्य दरवाजाकडे तोंड करून असेल. हे अशुभ मानले जाते. तसेच पलंगाच्या खाली जेवलेल ताट, किंवा कोणताही कचरा ठेवू नये.
बेडरुममध्ये देवघर नसावे
वास्तु आणि फेंगशुई दोन्हीमध्ये प्रार्थना कक्षाला विशेष महत्त्व आहे. शिवाय, पूजास्थळ सर्वात पवित्र मानले जाते, म्हणून ते बेडरूमपासून वेगळे ठेवले पाहिजे. बेडरुममध्ये कधीही देवघर नसावे.
बेडरूममध्ये फिश टँक ठेवू नये
फेंगशुईनुसार, बेडरूममध्ये फाउंटन किंवा फिशटँकसारख्या वस्तू ठेवल्याने आर्थिक नुकसान आणि नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढते.
टोकदार वस्तू ठेवू नयेत
बेडरूममध्ये चाकू, कात्री किंवा कोणतेही टोकदार वस्तू ठेवू नये. जर तुम्हाला ते ठेवायचेच असेल तर ते कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये ठेवा. बेडरूममध्ये झाडू ठेवणे देखील टाळावा.
बूट आणि चप्पल
बेडरूममध्ये बूट आणि चप्पल ठेवल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि हळूहळू नकारात्मक विचार येतात. म्हणून, फेंगशुईनुसार, या वस्तू बेडरूममध्ये ठेवू नयेत.