AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेंगशुईनुसार घरात ‘या’ गोष्टी ठेवा अन् पाहा कसे होतात सकारात्मक बदल…

ज्या लोकांना त्यांच्या नोकरीत उन्नती, जीवनात शांती हवी असेल त्यांनी फेंगशुईचे काही टिप्स नक्कीच वापरून पाहिल्या पाहिजेत. त्यामुळे आयुष्यात सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होते असही म्हटलं जातं.

फेंगशुईनुसार घरात 'या' गोष्टी ठेवा अन् पाहा कसे होतात सकारात्मक बदल...
Bring positive changes to your home with these Feng Shui itemsImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: May 05, 2025 | 7:05 PM
Share

प्रत्येकाने फेंगशुई हे नाव ऐकलं असेल. तर काहीजण त्या पद्धतीचा अवलंबही करताना दिसतात. त्यामुळे बऱ्यापैकी अनेकजणांना फेंगशुईचे नियम माहित असतील. फेंगशुईचा वापर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींसाठी वापर केला जातो. जसं की, ज्या लोकांना त्यांच्या नोकरीत किंवा जीवनात शांती हवी असते, त्यांच्या आयुष्यात फेंगशुईचे एक वेगळे स्थान असते. फेंगशुईच्या काही नियमांचे पालन केल्याने आयुष्यात सकारात्मक बदल होतात असं म्हटलं जातं

फेंगशुईमध्ये अनेक वस्तू असतात ज्यांचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर केला जातो. जाणून घेऊया त्या वस्तू नेमक्या कोणत्या.

ड्रॅगन टर्टल ड्रॅगन टर्टल हा एक प्रसिद्ध फेंगशुई उपाय आहे जो आपल्याला जीवनात नशीब, संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यास मदत करतो. ते ऑफिसच्या उत्तर दिशेला ठेवल्याने व्यवसाय वाढतो आणि रखडलेली करिअरची कामे सोडवण्यास मदत होते असे म्हटलं जातं. ते तुमच्या ऑफिसमध्ये ठेवल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव निघून जातो.

चिनी नाणी चिनी नाणी संपत्ती आणि नशीब आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात. जर तुम्ही तीन चिनी नाणी लाल रिबनमध्ये बांधली आणि ती तुमच्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये किंवा फाईलमध्ये ठेवली तर तुमची आर्थिक समृद्धी वाढते. मुख्य दरवाजाजवळ तीन नाणी ठेवल्याने किंवा एखाद्या लाल कपड्यात बांधून ते दाराच्या आतल्या बाजूने ठेवल्यास घरात पैशाची कमतरता भासणार नाही.

पाण्याचा कारंजे फेंगशुईनुसार, पाण्याचा प्रवाह म्हणजे संपत्तीचा प्रवाह. ऑफिस असो वा घर, जिथे जिथे पाणी वाहत असलेली वस्तू किंवा छोटासा फोटो असेल तिथे ती वस्तू शुभ मानली जाते. अशा वस्तू ईशान्य दिशेला ठेवल्याने जास्तीत जास्त फायदा होतो आणि मनाला शांती देखील मिळते.

क्रिस्टल बॉल से मानले जाते की तुमच्याभोवती क्रिस्टल बॉल ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. जर ते ऑफिसात ठेवले तर सर्व कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये चांगला समन्वय साधला जाईल . ते घरात ठेवल्याने सुख आणि शांती मिळते.

तर अशा काही फेंगशुईमध्ये वस्तू असतात ज्यांचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर केला जातो. तसेच फेंगशुईमध्ये प्रत्येक वस्तूंमागे अर्थ दडलेला असतो.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप