
अनेकांचा वार आणि त्यानुसार त्या त्या रंगांचे कपडे यावर विश्वास असतो. आणि त्यानुसार ते कपडे घालतातही. ज्योतिषशास्ज्ञानुसार काही राशींसाठी ठराविक असे काही रंगही दिलेले आहेत. त्या राशीच्या लोकांनी सांगितलेल्या रंगांचे कपडे घातल्याने त्यांना लाभ मिळतो असं मानलं जातं. जसं की गुरुवार या वाराबद्दलही अनेकांच्या श्रद्धा पहायला मिळतात. जसं की गुरुवारी काही रंगांचे कपडे घालणे टाळावे असं म्हटलं जातं. गरुवार आणि रंग यांच्यात नक्की काय संबंध आहे ते जाणून घेऊयात.
गुरुवार भगवान विष्णू आणि गुरूला समर्पित
गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरूला समर्पित असतो. तर, या दिवशी काही विशेष उपाय करण्यास सांगितले जातात. तसेच हेही जाणून घेऊयात की या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळावेत?
गुरुवार कोणाला समर्पित आहे?
गुरुवार हा एक खास दिवस मानला जातो. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. तसेच, हा दिवस गुरु ग्रहाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत, या दिवशी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु ग्रहाचे स्थान मजबूत असते, ते प्रत्येक क्षेत्रात सहज प्रगती करतात. त्यांना वैयक्तिक ते व्यावसायिक स्तरावर समस्यांना तोंड द्यावे लागते परंतु गुरु ग्रहामुळे ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात. गुरुवारी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया?
कामांमधील अडथळा दूर होतो
जर गुरुवारचे नियम पाळले तर जीवनातील सर्व कामे सहजपणे पूर्ण होतात. कामांमधील अडथळे दूर होतात असं म्हटलं जात. गुरुवारी परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगाद्वारे गुरुची स्थिती देखील मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत आणि कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळावेत याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या.
गुरुवारी या रंगांचे कपडे घालू नये
काळे कपडे: गुरुवारी चुकूनही काळ्या रंगांचे कपडे घालू नयेत. गुरुवारचा थेट संबंध गुरु ग्रहाशी आहे, त्यामुळे हा रंग गुरु ग्रहाची स्थिती कमकुवत करू शकतो. तसेच, या दिवशी या रंगांचे कपडे परिधान केल्याने जीवनात नकारात्मक ऊर्जा येते. असं म्हटलं जातं.
निळा रंग : गुरुवारी निळे कपडे घालणे देखील टाळावे. या दिवशी निळा रंग घालणे योग्य मानले जात नाही. या दिवशी निळ्या रंगाचा कोणतेही कपडे घालू नये.
गुरुवारी कोणत्या रंगांचे कपडे घालणे फायदेशीर?
गुरुवारी पिवळा रंग घाला.
गुरुवारी पिवळा रंग परिधान करण्याचे अनेक फायदे आहेत. हा रंग मनाला आनंदी ठेवतो आणि गुरु ग्रहाचा प्रभाव जीवनावरही चांगला असतो. या दिवशी पिवळ्या रंगाचा कोणताही रंग परिधान करता येतो.
गुरुवारी सोनेरी रंगाचे कपडे घाला.
गुरुवारी सोनेरी रंगाचे कपडे देखील योग्य असतात. गुरुवारी सोनेरी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. अशा प्रकारे, गुरुवारी इतर अनेक उपाय केले जाऊ शकतात. या दिवशी पाण्यात हळद घालून आंघोळ करण्याचे अनेक फायदे होतात असे म्हटले जाते.
गुरुवारी दान करू शकता.
जर गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद देतात. या दिवशी गाईला गूळ आणि हरभरा खाऊ घातल्यानेही अनेक फायदे होतात. गुरु ग्रहाला बळकटी देण्यासाठी गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे चांगले मानले जाते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )