
बल्गेरियातील भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिच्या भविष्यवाण्यांची जगभर चर्चा होते. ती जन्मतः अंध असली तरी तिने जगाच्या पसाऱ्याविषयी आणि जगातील अनेक घडामोडींविषयी भाकीत केले आहेत. त्यातील काही भाकीतं खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो. तिच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा अनेकदा करण्यात येतो. 9/11 अमेरिकन हल्ल्यानंतर ती प्रकाश झोतात आली. कारण तिच्या गूढ काव्यात तिने याविषयीचे वर्णन लिहिले होते. तर तिने 2025 मध्ये या 5 राशींना बक्कळ पैसा मिळण्याचे भाकीत वर्तवले आहे. या राशींना धन, वैभव आणि समृद्धी मिळेल असा दावा करण्यात आला आहे.
कोणत्या आहेत त्या राशी?
1. मेष रास (Aries) : पैसाच पैसा मिळणार
बाबा वेंगाच्या भाकितानुसार, मेष राशीसाठी हे वर्ष, 2025 एकदम खास असणार आहे.
नोकरी करणाऱ्या व्यक्तीला नवीन नोकरी अथवा बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.
तर व्यापार, व्यवसाय करणार्यांना मोठी संधी मिळेल.
शेअर बाजार, मालमत्तेत गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल.
भाग्याची साथ मिळेल आणि मेहनतीला फळ येईल.
पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एकदा अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या
2. कुंभ रास (Aquarius) : अचानक मोठा धन लाभ
2025 मध्ये कुंभ राशीचे नशीब अचानक पलटेल
फसलेला पैसा परत मिळेल. उधारी वसूल होईल
क्रिप्टोकरेंसी वा डिजिटल व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो
नोकरीत नवीन संधी आपसूक गवसेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल
स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना हे वर्ष लाभदायक ठरणार
तुमच्या ध्येयावरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. वायफळ खर्च करू नका
3. वृषभ रास (Taurus) : कमाई आणि बचत वाढणार
वृषभ राशीसाठी वर्ष 2025 हे बक्कळ कमाई घेऊन येईल
नोकरीत बढतीसह पगार वाढ होईल. चांगले योग जुळून येत आहे.
व्यवसायात मोठा फायदा होईल. बांधकाम, उत्पादन क्षेत्रातील लोकांना फायदा होईल
बचत आणि गुंतवणूक योजनेत दीर्घकालीन लाभ मिळले
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे वर्ष जोरदार
4. कर्क रास (Cancer) : मालमत्तेतून मोठा फायदा
कर्क राशीच्या लोकांना यावर्षी मालमत्ता खरेदी-विक्रीतून मोठा फायदा होईल
घर, जमीन वा फ्लॅट खरेदीत फायदा होईल
व्यवसाय, व्यापारात नवीन ओळखी वाढतील, नवीन ऑर्डर मिळतील
नोकरदार वर्गाला चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर येईल
कमाईचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील
पण गडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक गुंतवणूक करा.
5. सिंह रास (Leo) : नाव लौकिक आणि दौलत दोन्ही मिळतील
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष म्हणजे सुपरहिट असेल
कला, मीडिया आणि मनोजरंजन क्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी आणि पैसा मिळेल
नोकरीत बढती आणि नवीन जबाबदारी मिळेल
व्यवसायात नवीन प्रस्ताव तुमची आर्थिक स्थिती बदलवून टाकेल
कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हे वर्ष चांगले, आत्मविश्वास भक्कम ठेवा
डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.