Baba Vanga: मे महिन्याचा तिसरा आठवडा गेमचेंजर, कुणाचे नशीब फळफळणार?

Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: मे महिन्याचा तिसरा आठवडा या राशींसाठी गेमचेंजर ठरणार आहे. या राशींचे नशीब फळफळणार आहे. त्यांना जॅकपॉट लागणार आहे. काहींना नोकरी लागणार आहे. तर काहींच्या नोकरीत मोठा बदल होऊ शकतो.

Baba Vanga: मे महिन्याचा तिसरा आठवडा गेमचेंजर, कुणाचे नशीब फळफळणार?
कोणत्या राशीचे नशीब फळफळणार?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 17, 2026 | 3:53 PM

Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: जगभरात बाबा वेंगा ही तिच्या भविष्यवाणीसाठी ओळखली जाते. तिच्या भाकीताविषयी अनेकांना उत्सुकता असते. वेळ, काळानुसार तिचे भाकीतं खरी ठरली आहेत. पुढील आठवड्यात 18 ते 24 मे दरम्यान बाबा वेंगा हिच्या भाकि‍ताने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्योतिष आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार, मे महिन्याचा तिसरा आठवडा मिथुन, कन्या यासह 5 राशींसाठी अत्यंत शुभकारक ठरू शकतो. करिअर, संपत्ती, कुटुंब आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात या राशींना फायदा होईल.

मिथुन राशीसाठी जॅकपॉट

बाबा वेंगानुसार, मिथुन राशीसाठी 18 ते 24 मे हा काळ भाग्यकारक असेल. या काळात त्यांना नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास घेऊन येईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागतील. नोकरदारांसाठी हा काळ चांगला असेल. नोकरीत बदल करण्याची संधी येईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. त्यांचे सहकार्य मिळेल. व्यापार आणि व्यवसायात नवीन संधी चालून येतील. ग्रहांचा चांगला प्रभाव या राशींच्या आर्थिक स्थितीवर दिसून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा असलेली वार्ता कानी येईल.

कन्या राशीच्या व्यक्तीचा करिअरचा ग्राफ उंचावले, पैसा हाती येईल

बाबा वेंगानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी हा तिसरा आठवडा अत्यंत अनुकूल असेल. त्यांचा करिअरचा ग्राफ उंचावेल. तर आर्थिक क्षेत्रात त्यांना मोठा फायदा होईल. घर आणि वाहन खरेदीचा योगही निर्माण होत आहे. स्पर्धात्मक परीक्षा दिली असेल तर चांगली वार्ता कानी येईल. गेल्या अनेक दिवसांपासून नोकरी बदलण्याची इच्छा आता पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. योग्य ठिकाणी संधी मिळेल. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. वैयक्तिक आणि नोकरीच्या ठिकाणचे वाद संपुष्टात येतील.

तुळा राशी असणाऱ्यांचे नशीब चमकणार

तुळा राशीसाठी 18 ते 24 मे दरम्यानचा काळ आर्थिक लाभ आणि नाते घट्ट होण्याचे संकेत देत आहेत. कुटुंब आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यापारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मंदी दूर होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमात मनाच्या इच्छा पूर्ण होतील. पती-पत्नीतील संबंध मधुर होतील. गेल्या काही महिन्यांपासून वाटणारी हुरहूर आणि मानसिक चिंता दूर होईल. मनात आनंदाच्या उकळ्या फुटतील. धार्मिक यात्रा पण घडू शकते.

मकर राशीच्या व्यक्तींच्या मेहनतीला फळ

मकर राशीच्या व्यक्तींच्या मेहनतीला या तिसऱ्या आठवड्यात फळ मिळले. नोकरी आणि व्यापार उद्दीमात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा चांगला काळ म्हणावा लागेल. तर कुणाला उधारा दिलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्य सुधारेल आणि सामाजिक मान-सन्मान मिळेल.

मीन राशीसाठी आनंदवार्ता

मीन राशीच्या लोकांना मे महिन्याचा तिसरा आठवडा आनंदवार्ता घेऊन येईल. त्यांच्यावर नशीब मेहरबान असेल. काही कायदेशीर अडचणी वा प्रकरणात अडकलेला असाल तर त्यातून बाहेर पडला अथवा मोठा दिलासा मिळेल. करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तशी संधी चालून येईल. आर्थिक स्थिती लाभदायक असेल. प्रेमात मोठे यश मिळेल.

(डिस्क्लेमर : बाबा वांगा यांची भविष्यवाणी ही केवळ माहिती म्हणून देण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठी त्याविषयी कोणताही दावा करत नाही.)

Follow Us