
बाबा वेंगा हिच्या भाकीतानुसार, जुलै महिन्यात मेष, तुळा, सिंह आणि धनू राशींचे नशीब फळफळणार आहे. महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना आश्चर्याचे धक्के बसतील. त्यांनी विचार केला नसेल इतका त्यांचा फायदा होणार आहे. त्यांना करिअर, व्यवसाय आणि नातेसंबंधात चांगल्या वार्ता कानी पडतील. काय आहे वेंगा हिचे भाकीत?
मेष (Aries) : नवीन संधी दारात
बाबा वेंगा हिच्या भाकीतानुसार, मेष राशीचे भाग्य उजळणार आहे. त्यांना नवीन संधी चालून येतील. भाग्य त्यांच्या बाजूने असल्याचा त्यांना पदोपदी अनुभव येईल. त्यांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात मोठे बदल दिसून येतील. अचानक जीवन नवीन वळणावर आल्याचे जाणवेल. तुमचा आनंद गगनात मावणार नाही.
तुळा (Libra) : प्रेमात पडाल आणि पैसा पदरात पडेल
तुळा राशीची लोकांना आता आर्थिक सुबत्ता येईल. त्यांच्या हाती पैसा खुळखुळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक वाटेवर त्यांना प्रगती साधता येईल. प्रेमात नाट्यमय आणि आवडीचे वळण येईल. प्रेमात पडाल. पैसा पदरात पडेल. या काळात आनंददायी घटनांची मालिका सुरू असल्याचे जाणवेल.
सिंह (Leo) : आता नेतृत्व कराच
अनेक लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. तुम्हचे वलय वाढेल. तुमच्या कार्याचे आणि कामाचे कौतुक होईल. तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साहाची अनुभूती होईल. तुम्ही चुंबक असल्याचा इतरांना भास होईल. तुम्ही आता नेतृत्व करायला हरकत नाही. अनेक संधी या काळात चालून येतील.
धनू (Sagittarius) : नवीन आयाम तयार होतील
जुलैच्या या अखेरच्या टप्प्यात आयुष्यात एका पाठी एक घटनांची नांदी असेल. पुस्तक वाचणं, पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी, अध्यात्माची वाट अशा अनेक घटना एका मागे एक घडतील. तुम्ही वेगळ्याच दुनियेत असाल. तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक भरभराट झाल्याचे दिसेल. काही वेगळ्या वाटा धुंडाळाल. त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल. या दिवसात सळसळता उत्साह आणि चैतन्याची अनुभती झाल्याशिवाय राहणार नाही.
डिस्क्लेमर : ही सर्वसामान्य माहिती आहे. टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही.