AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Prediction: या राशींवर लक्ष्मी प्रसन्न, चिंता छुमंतर, कमाईसोबतच नोकरीची नवीन संधी, कुणाचे नशीब उघडणार?

Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: बाबा वेंगाची भविष्यवाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 13 ते 19 जुलै दरम्यान मेष, वृश्चिकसह या राशींचे नशीब पाटलणार आहे.

Baba Vanga Prediction: या राशींवर लक्ष्मी प्रसन्न, चिंता छुमंतर, कमाईसोबतच नोकरीची नवीन संधी, कुणाचे नशीब उघडणार?
या राशींवर लक्ष्मी प्रसन्न, चिंता छुमंतर
| Updated on: Jul 11, 2026 | 4:12 PM
Share

Baba Vanga Weekly Horoscope 2026: बाबा वेंगा हिच्या भविष्यवाणीची सोशल मीडियावर पुन्हा जोरदार चर्चा आहे. पुढील आठवड्यासाठी 13 ते 19 जुलै या कालावधीत मेष, वृश्चिकसह या 5 राशींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठ्या घडामोडी घडतील. नोकरीत नवीन संधी मिळतील. तर प्रेमातही हा आठवडा या राशींसाठी खास राहणार आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी?

मेष रास: चाह है तो राह है

इच्छा तिथे मार्ग असे म्हणतात, याचा प्रत्यय मेष राशीच्या व्यक्तींना या नवीन आठवड्यात येईल. त्यांना नवीन संधी चालून येतील. दीर्घकाळापासून प्रलंबित कामं मार्गी लागतील. घर खरेदीची प्रबळ योग आहे. नोकरीत नवीन संधी मिळतील. अधिकारी, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायात मोठा फायदा होईल. प्रेम संबंध मधुर होतील. जीवनसाथीचे सहकार्य मिळले.

कर्क रास: मेहनतीला फळ

गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मेहनत घेत आहात. तुमच्या मेहनतीचे आता कौतुकच होणार नाही तर शाबासकी ही मिळेल. नवीन जबाबदारी सोपवली जाईल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. कर्ज मुक्त होण्यासाठी मदत होईल. गेल्या काही दिवसांपासून खास व्यक्तीसोबतचा दुरावा आणि नातेसंबंधातील कटुता कमी होईल. आरोग्यात सुधारणा होईल. जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. 13 ते 19 जुलै हा आठवडा सर्वार्थाने लाभदायक ठरेल.

सिंह रास: करिअरची ट्रेन सुसाट

बाबा वेंगानुसार, 13 ते 19 जुलै हा कालावधी नोकरदार वर्गासाठी एकदम खास असेल. गेल्या काही दिवसांपासून नोकरीवरील गंडातंर दूर होईल. करिअरची ट्रेन सुसाट धावेल. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही रोजगाराच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळेल. आई-वडीलांचे आशीर्वाद मिळतील. अनेक मोठ्या लोकांचा सहभाग लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथी खांद्याला खांदा लावून उभा राहिल. नवीन घर खरेदीचा योग आहे.

वृश्चिक रास: या सुखांनो घरी माझ्या

बाबा वेंगानुसार 13 ते 19 जुलै हा आठवडा अनेक दृष्टीने लाभदायक ठरेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तीची इतक्या दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल. कायदेशीर प्रकरणात मोठा दिलासा मिळेल. लव्ह लाईफमधील समस्या दूर होईल. नात्याची गाडी रुळावर येईल. नोकरी करणाऱ्यांची अडचण दूर होईल. व्यवसायात वृद्धी होईल.

मकर रास: एकाचे चार हात

बाबा वेंगानुसार, मकर राशीच्या व्यक्तींना लग्नाचे योग चालून येतील. 13 ते 19 जुलै या कालवधीत एखादे चांगले स्थळ चालून येईल. आता विवाह योग नसला तरी हे नाते तुमचे आयुष्य बदलून टाकेल. या आठवड्यात एखादे धार्मिक कार्य होईल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात आनंदवार्ता मिळतील. पदोन्नती आणि नवीन जबाबदारी मिळेल. व्यक्तिगत जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसतील.

(डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही केवळ माहिती म्हणून देण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठी त्याविषयी कोणताही दावा करत नाही.)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा