
जगात शांतता नांदावी आणि मानवतेचा अंकूर फुलावा म्हणून BAPS आणि संयुक्त राष्ट्राकडून वैश्विक पातळीवर कार्यक्रम केले जात आहे. या संयुक्त कार्याला 30 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने स्वामीनारायण संस्था BAPS आणि संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय उत्सवाचं आयोजन केलं होतं. व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयात हा अभूतपूर्व प्रेरणादायी आंतरराष्ट्रीय समारंभ पार पडला. यावेळी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* BAPS आणि संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) च्या दरम्यान तीन दशकांची भागिदारी झाली आहे. त्याचा उत्सवही यावेळी करण्यात आला.
* परम पूज्य ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराज यांनी संयुक्त राष्ट्र मुख्यालय (न्यूयॉर्क) मध्ये जगप्रसिद्ध “मिलेनियम वर्ल्ड पीस समिट” हे भाषण केलं होतं. या भाषणाला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याचाही उत्सव यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमानिमित्ताने अफगाणिस्तान, इजिप्त, भारत, इंडोनेशिया, केनिया, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड आणि अमेरिकेच्या राजदूतांनी, संयुक्त राष्ट्रातील अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी एकत्रितपणे सर्वांनी मानवता, वैश्विक शांतता निर्माण करण्याचा संकल्प केला. तसेच मानवतेच्या सेवेचं, असं आवाहनही केलं.
baps
विक्रमजीत दुग्गल (कौन्सिलर, भारतीय मिशन) –
BAPS आणि संयुक्त राष्ट्र दोन्हीही संस्था एकता, करुणा आणि सर्वांगिण प्रगतीच्या मूल्यांवर आधारीत आहे. हेच मूल्य जगाच्या भविष्याला दिशा देत आहेत, असं विक्रमजीत दुग्गल म्हणाले.
पेरी लिन जॉनसन (सहायक महासंचालक, IAEA) –
या कार्यक्रमाची थीम अत्यंत प्रेरणादायी होती. “Light, Peace and Partnership” ही थीम अत्यंत समर्पक आणि सार्थक अशीच होती. BAPSने व्हिएन्नातील यूएन समुदायाला एकतेच्या ऊर्जेने जोडून ठेवलं आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आणि उपयुक्त आहे. BAPSचं जगभरातील मदतकार्य अत्यंत अनमोल असं राहिलं आहे. विशेषत: यूक्रेनमधील शरणार्थींसाठी BAPSने दाखवलेले मानवीय प्रयत्न अत्यंत उल्लेखनीय आहेत. तसेच BAPSच्या सेवांबाबत ऐकल्यावर मी कुटुंबातच आलेय असं वाटतं, असं पेरी यांनी म्हटलं.
युको यासुनागा (उप महासंचालक, UNIDO) –
नागरी समाज, आध्यात्मिक संघटना आणि सरकारी संस्था एकत्र येऊन समभावाने कार्य करू लागल्या तरच सतत विकास होतो. त्यातूनच वास्तविक मार्ग सापडतो, असं सांगतानाच BAPS ही संस्था चांगला सहकारी आणि शेजारी आहे, असं युको यासुनागा यांनी सांगितलं.
यान डूबॉस्क, महापौर, ब्यूसी-सेंट-जॉर्जेस (पॅरिस) –
BAPSकडून युरोपात आंतर सांस्कृतिक सौहार्द आणि मूल्यावर आधारीत संवादाची पेरणी केली जात आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, असं यान डूबॉस्क यांनी सांगितलं. पॅरिसमधील आगामी BAPS मंदीर हे युरोपाच्या सांस्कृतिक एकात्मता आणि उज्जवलतेचं प्रतिक बनेल, असंही त्यांनी म्हटलंय.
ब्रह्मविहारिदास स्वामी (प्रमुख – BAPS हिंदू मंदिर, अबू धाबी) –
“Peace through Partnership” या प्रेरणादायी भाषणात वास्तविक शांततेचं महत्त्व देण्यात आलं आहे. जेव्हा मनुष्याच्या हृदयात नि:स्वार्थता, कृतज्ञता आणि सेवाभाव ठासून भरलेला असेल तेव्हाच वास्तविक शांतता निर्माण होते, असं सांगतानाच आपण सर्व मिळून जगाला एक कुटुंब मानून सेवा आणि सद्भावनेचा दीप प्रज्वलित केला पाहिजे, हाच BAPSचा मूलमंत्र आहे, असं ब्रह्मविहारिदास स्वामींनी सांगितलं.
परम पूज्य महंत स्वामी महाराज –
या कार्यक्रमाचा समारोप परम पूज्य महंत स्वामी महाराजांच्या आशीर्वादपर प्रवचनाने झाला. तुमच्या जीवनात असा दिवा पेटवा की ज्याने जग चांगुलपणा, करुणा आणि शांतीच्या प्रकाशाने भारून जाईल, असं महंत स्वामी महाराज म्हणाले.
रीना अमीन (प्रमुख – BAPS यूके आणि यूरोप)
रीना अमीन यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. आम्ही BAPS चे स्वयंसेवक, सत्यनिष्ठा, विनम्रता आणि मानवहिताच्या भावनेने जगाची सेवा करण्यासाठी निरंतर सहयोग देण्याची आणि या कार्यात सहभागी होण्याची आशा करतोय, असं रीना अमीन यांनी म्हटलंय.