Bhai Dooj 2025: भाऊबीजेला या चुका टाळा, शुभ मुहूर्त कधी ?

Bhai Dooj Puja Direction : भाव-बहिणीच्या प्रेमळ नात्याचं प्रतीक असलेला सण म्हणजे भाऊबीज. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीयेला भाऊबीज साजरी कली जाते. मान्यतेनुसार, भाऊबीजेच्या दिवशी औक्षणाचे काही विशेष नियम असतात. यावेळी काही चुका होऊ शकतात, त्या टाळाव्यात. जाणून घ्या सविस्तर माहिती..

Bhai Dooj 2025: भाऊबीजेला या चुका टाळा, शुभ मुहूर्त कधी ?
भाऊबीजेला या चुका टाळा
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Oct 23, 2025 | 9:51 AM

Bhai Dooj Rituals : भाऊ-बहिणींमधील प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक म्हणजे भाऊबीजेचा सण. या दिवशी बहिणी आपल्या भावांना कुंकवाचा चिळा, अक्षता लावून औक्षण करतात, त्यांन मिठाई, गोड पदार्थ भरवात. तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. भाऊ त्यांच्या बहिणींना प्रेम आणि संरक्षणाचे आश्वासन देऊन भेटवस्तू देखील देतात. पण ज्योतिषशास्त्रात भआूबीजेच्या औक्षणाशी निगडीत काही नियम आणि परंपरा सांगण्यत आले आहेत, त्या चुकूनही तोडू नयेत. या लहान नियमांकडे दुर्लक्ष केल्याने शुभ मुहूर्ताचा प्रभाव कमी होऊ शकतो. भाऊबीजेच्या समारंभात काही चुका टाळा, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

भाऊबीजेचा शुभ मुहूर्त

वेळ: 23 ऑक्टोबर दुपारी 1:13 ते 3:28.
कालावधी: 2 तास 15 मिनिटं

शुभ मुहूर्त लक्षात ठेवा, राहुकालादरम्यान औक्षण नको

या दिवशी औक्षण नेहमी शुभ मुहूर्तावर करावं. या दिवशी राहुकाल देखील असेल. राहुकाल अशुभ मानला जातो, म्हणून राहुकाल वगळता शुभ मुहूर्तावर औक्षण करून घ्या.

बसण्याची योग्य दिशा

भावाचा चेहरा: औक्षण करताना भावाने उत्तर किंवा ईशान्य दिशेला तोंड करून बसावे. पूर्वेकडे तोंड करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे भावाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्याच्या आयुष्यात यश मिळते.

बहिणीचा चेहरा: औक्षण करताना बहिणीने ईशान्य किंवा पूर्वेकडे तोंड करावे, ते शुभ मानले जाते.

चूक टाळा : तुमच्या भावाला कधीही दक्षिणेकडे तोंड करून बसवू नका.

आसनाशिवाय बसवू नका

औक्षण करताना जमिनीवर कधीच खाली बसवू नये, नेहमी एखादी सतरंजी किंवा आसन घालून मग त्यावर भावाला बसायला सांगावे.

योग्य विधी :तुमच्या भावाला नेहमी स्वच्छ लाकडी स्टूलवर किंवा उंच आसनावर बसवा. तुमच्या बहिणीलाही स्वच्छ आसनावर बसवा.

चूक: आसन किंवा स्टूलवर बसल्याशिवाय औक्षण करणे टाळा.

औक्षणापूर्वी भोजन नको

धार्मिक मान्यतेनुसार, भाऊबीजच्या दिवशी, बहिणी औक्षण पूर्ण होईपर्यंत उपवास ठेवतात किंवा काहीही खात किंवा पीत नाहीत.

नियम: बहिणीने औक्षण केल्यावर आणि भावाला जेवू घातल्यानंतरच जेवावे.

औक्षणाचे ताम्हन

योग्य साहित्य: औक्षण करताना ताम्हनात अक्षता, कुंकू सुपारी, नाणं, सोन्याची अंगठी आणि निरांजन ठेवा.

या चुका टाळाव्यात

औक्षण करताना ताम्हनात तुटलेले तांदूळ (अक्षत) वापरू नका. फक्त संपूर्ण तांदूळच शुभ मानले जातात.

पूजेचे ताट प्लास्टिकचे किंवा काळे नसावे. स्वच्छ पितळ, तांबे किंवा स्टीलचे अथवा चांदीचे ताम्हन वापरू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)